आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी जयंती सोमवारी : कशामुळे शनिदेवाला मानले जाते क्रूर ग्रह, काही सवयी ज्यामुळे नष्ट होतो शनीचा दुष्प्रभाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 3 जून रोजी शनी जयंती आहे. अनेक लोक शनिदेवाला क्रूर ग्रह मानतात. प्रत्येकाला असे वाटते की, शनी नेहमी वाईटच करतो परंतु शनी केवळ वाईटच करत नाही तर शुभफळही प्रदान करतो. शनीच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. शनिदेव कधीही विनाकारण त्रास देत नाहीत. शनिदेव फक्त व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ प्रदान करतात. 


वास्तवामध्ये ज्योतिषमध्ये शनीला श्रम, गरीब, कामगार, सेवक आणि न्याय कारक ग्रह मानले गेले आहे. शनिदेवाला न्यायाधीशाचे पद देण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर शनिदेवाचा प्रभाव राहतो परंतु ढय्या, साडेसाती आणि महादाशेमध्ये यांचा प्रभाव जरा जास्तच राहतो. कोणताही उपाय न करताही शनीच्या अशुभ प्रभावाला कमी करणे शक्य आहे. परंतु यासाठी प्रत्येक व्यक्तीने शनिदेवाला आवडत नसलेल्या गोष्टींपासून दूर राहावे आवश्यक आहे.


1 - शनिदेव श्रम प्रिय आहेत. जर तुम्ही आळसाचा त्याग करून कष्टाने आयुष्य जगत असाल तर शनिदेव तुम्हाला कधीच त्रास देत नाहीत.
2 - शनिदेव कामगार आणि गरीब लोकांचे प्रतिनिधी मानले जातात. तुम्ही एखाद्या कामगाराचा हक्क हिरावून घेत असाल किंवा गरिबाला त्रास देत असाल तर शनिदेवाच्या तुमच्यावर कायम वक्रदृष्टी राहते.
3 - शनिदेव न्याय कारक ग्रह आहेत. तुम्ही एखाद्यावर अन्याय करत असाल तर शनिदेव तुम्हाला कधीही क्षमा करत नाहीत.
4 - शनिदेवाला उत्तम चारित्र्य आवडते. तुमची वागणूक चांगली नसेल तर शनीच्या अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागते.
5 - मांसाहार आणि मद्य सेवन करणाऱ्या लोकांवर शनीची नेहमी वक्रदृष्टी राहते. शनीच्या शुभ प्रभावासाठी या गोष्टींपासून नेहमी दूर राहावे

बातम्या आणखी आहेत...