Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | shani-jayanti-unfortunately-such-a-change-in-fortune

उद्या शनीजयंती, दुर्भाग्या दूर करण्याची सुसंधी

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 31, 2011, 01:18 PM IST

1 जून रोजी शनिजयंती आहे. शनीला प्रसन्न करून घेण्याची ही नामी संधी आहे.

 • shani-jayanti-unfortunately-such-a-change-in-fortune

  भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा वेगळा स्वभावधर्म असतो आणि त्यानुसार संबंधीत व्यक्तीवर ते ग्रह आपला प्रभाव टाकत असतात. मनष्य जीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा ग्रह आहे शनी. शनी एखाद्या श्रीमंत माणसालाही भिकारी बनवू शकतो. 1 जून रोजी शनिजयंती आहे. शनीला प्रसन्न करून घेण्याची ही नामी संधी आहे. शनी प्रसन्न झाला तर आपल्या दुर्भाग्य दूर व्हायला वेळ लागत नाही.
  शनीदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी पुढील मंत्राच जप करा.
  ओम शन्नोदेवीरभिष्ट्य आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु न:
  लघुमंत्र
  ओम ऐं ह्रीं श्रीशनैश्वराय नम:
  जप विधी
  शनीजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी करून आसनावर बसा. समोर शनीदेवाची प्रतिमा ठेवून पंचोपचाराने पूजा करा. त्यानंतर रुद्राक्ष माळेने वरील मंत्राचा जप करा.

Trending