आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी सूर्यास्तानंतर करा शेंदूर आणि दह्याचा सोपा उपाय, मिळेल शनी दोषातून मुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात 22 तारखेला शनिवारी प्रदोष व्रत आहे. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व्रत-पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी शनिवार असल्यामुळे याला शनी प्रदोष म्हटले जाईल. तुम्हीही शनिदेवाच्या दोषामुळे त्रस्त असाल तर या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खाली सांगण्यात आलेले उपाय करू शकता...तत्पूर्वी जाणून घ्या, शिव पूजेचा विधी...


- पाणी न पिता प्रदोष व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर-पार्वती आणि नंदीला पंचामृत, गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षता, अर्पण करून धूप-दीप लावून नावैद्य दाखवून पूजा करावी.


- संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.


- आठ दिशांना आठ दिवे लावावेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा. शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करावे.


- अशा प्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे.


शनिदेवाला प्रसन्न करण्याचा उपाय 
शनिवारी उडदाच्या डाळीचे दोन वडे करावेत आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर या वड्यांवर थोडे दही आणि शेंदूर लावावा. त्यानंतर हे वडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावेत. मागे वळून पाहू नये. थेट घरी येऊन हात-पाय धुवावेत. वडे आणि दह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर करू नये. या उपायाने तुम्हाला शनी दोषातून मुक्ती मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...