शनी राशिफळ / 30 एप्रिलपासून 18 सप्टेंबरपर्यंत शनी राहणार वक्री, सर्व 12 राशींवर पडेल थेट प्रभाव

मेषपासून मीनपर्यंत कोणासाठी भाग्यशाली राहील वक्री शनी, कोणी राहावे सावध

रिलिजन डेस्क

May 01,2019 12:05:00 AM IST

मंगळवार 30 एप्रिल 2019 रोजी शनी धनु राशीमध्ये वक्री झाला आहे. आता हा ग्रह 18 सप्टेंबर 2019 पर्यंत वक्री राहील. शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. शनिदेवाला न्यायाधीशही मानले जाते. सूर्यदेवाचे पुत्र असून आपल्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. चाल बदलल्यामुळे सर्व राशींवर शनीचा प्रभावही बदलला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींवर कसा राहील शनीचा प्रभाव...


मेष
शनी वक्री झाल्यामुळे एखाद्या मोठ्या कामासाठी वर्तमान ठिकाण सोडावे लागू शकते. नोकरीत लाभ आणि अपत्य सुख प्राप्त होईल. वाहन सुख मिळेल. कुटुंबाच्या मदतीने वादामध्ये यश प्राप्त कराल.


वृषभ
वक्री शनी या राशीसाठी लाभकारी राहील. योजना यशस्वी होतील आणि आर्थिक लाभ शक्य आहे. लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. एखादे मोठे यश मिळाल्यामुळे प्रसन्न राहाल. मित्रांची मदत मिळेल.


मिथुन
शनी वक्री असल्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. कामामध्ये मन लागणार नही. निराशा राहील. उत्सव काळातही उदास राहाल. मानसिक संतुलन ढासळू देऊ नये.


कर्क
अज्ञात भय, चिंता राहील. विचारपूर्वक काम कराल परंतु महत्त्वाचे निर्णय घेण्यात उशीर होईल. ओळखीचा फायदा करून घेण्यात यशस्वी होऊ शकणार नाहीत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींवर कसा राहील शनीचा प्रभाव...

सिंह शनी वक्री झाल्याचा या राशीवर जास्त प्रभाव दिसणार नाही. परिस्थिती सामान्य राहील. कामामध्ये खूप मेहनतीने आणि उशिराने यश प्राप्त होईल. प्रभाव वाढेल. कन्या हा काळ दिलासा देणारा राहील. नवीन प्लॅनिंग कराल आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा व्हाल. मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या अडचणी समाप्त होतील. धनलाभाचे योग आहेत.कुंभ कामाचा व्याप जास्त राहील. इच्छा नसलेली कामेही करावी लागू शकतात. शीघ्र पैसे कमावण्याच्या योजनेमध्ये नुकसान होऊ शकते. पाहुण्यांचे आगमन होईल. मीन वक्री शनी लाभदायक राहील. व्यापारात वृद्धी होईल. कुटुंबात समृद्धी राहील आणि देवावरील विश्वास वाढेल. नवीन व्यवसाय चालू होऊ शकतो.धनु अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे. कामामध्ये उशीर झाल्यामुळे तणाव वाढेल. नवीन समस्या उत्पन्न होऊ शकतात. आर्थिक तंगी जाणवेल. अपत्यामुळे दुःख होऊ शकते. मकर वक्री शनीचा लाभ या राशीच्या लोकांना होईल. धन आणि आरोग्यामध्ये लाभ तसेच सामनामध्ये वृद्धी होईल. मुलांकडून फायदा होईल. नवीन कामामध्ये यश प्राप्त होईल. स्थावर मालमत्तेतून लाभ.तूळ शनी वक्री होणे तुमच्यासाठी लाभकारी राहील. धन तसेच सामनामध्ये वृद्धी होईल. तीन महिन्यांपासून होत असलेले नुकसान भरून निघेल आणि प्रभावही वाढेल. वृश्चिक सतर्क राहावे आणि कोणत्याही कामाकडे कानाडोळा करू नये. विचारपूर्वक कार्य करावे आणि फसव्या योजनांपासून दूर राहावे. गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नयेत. वाहन सावकाश चालवावे.
X
COMMENT