आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिश्चरी अमावस्येचे 7 उपाय, अडचणींमधून मिळू शकते मुक्ती, 11 ऑगस्टला करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 11 ऑगस्टला शनिश्चरी अमावास्या आहे. हा एक शुभ योग आहे. या योगामध्ये दुर्भाग्य दूर करण्यासाठी काही खास उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. अमावास्येला कालसर्प दोष आणि पितृ दोष दूर करण्यासाठीसुद्धा उपाय केले जाऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


पहिला उपाय 
नोकरी किंवा इतर आर्थिक कामामध्ये बाधा निर्माण होत असल्यास अमावास्येच्या दिवशी पक्ष्यांना सव्वा किलो धान्य खाण्यासाठी टाकावे. यासाठी अशा ठिकाणी जावे, जेथे भरपूर पक्षी असतील. या उपायाने अक्षय्य पुण्य प्राप्त होऊ शकते.


दुसरा उपाय 
एखाद्या हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ऊँ रामदूताय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


तिसरा उपाय 
शनी अमावास्येला शनिदेवासाठी विशेष उपाय अवश्य करावा. पिंपळाच्या झाडाला जल आणि दूध अर्पण करावे. सात प्रदक्षिणा घालाव्यात. हनुमान चालीसाचा पाठ करावा. या उपायाने शनिदोष दूर होतात.


चौथा उपाय 
राहू-केतुचे दोष दूर करण्यासाठी अमावस्या तिथीला एखाद्या गरिबाला काळी घोंगडी दान करावी.


पाचवा उपाय 
अमावास्येला पितरांसाठी धूप-ध्यान करावे. यासाठी शेणाची गोवरी जाळून त्यावर तूप-गूळ टाका. पितरांना हार-फुल अर्पण करा. दिवा लावावा. या उपायाने घरात सुख-शांती राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...