आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकर महादेवनच्या बर्थडे पार्टीत संगीत क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती, झाकिर हुसैन यांचा शिष्य बनला फरहान अख्तर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी 3 मार्च रोजी 53 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला त्यांच्या घरी एका म्युझिक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या पार्टीचा व्हिडिओ फरहान अख्तरनेही शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तबला वादन करताना दिसतोय.

असा साजरा झाला वाढदिवस

शंकर महादेवन यांचा वाढदिवस म्युझिकल अंदाजात साजरा करण्यात आला. गायिका हर्षदीप कौरने 'राझी' चित्रपटातील दिलबरो गाणे सादर केले. या गाण्याला उस्ताद झाकिर  हुसैन यांनी तबल्यावर साथ दिला. पार्टीत प्रसून जोशी, सलीम मर्चंट, जावेद अख्तर, शेखर रावजियानी आणि सयामी खेर उपस्थित होते. फरहान तबला वाजवत असताना झाकिर स्वत: माइक पकडून होते.

सलीम मर्चंटचाही वाढदिवस 

3 मार्च रोजी इंडस्ट्रीतील तीन दिग्गजांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शंकर महादेवन व्यतिरिक्त सलीम मर्चंट आणि श्रद्धा कपूर यांनीही आपला वाढदिवस साजरा केला. सलीमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन लिहिले, 'शंकर, जीनो आणि मी माझा वाढदिवस गेल्या 10 वर्षात अनेकदा संगीतमय वातावरणात साजरा केला आहे. यावेळी राकेश मेहराने आम्हाला कॅमे-यात कैद केले.'