आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Shantanu Maheshwari Wants To Build A Playground For Children By Becoming Santa Claus, Saurabh Raj Jain Will Spread Peace In The Country

सांताक्लॉज बनून शंतनू माहेश्वरी मुलांसाठी बनवू इच्छितो खेळाचे मैदान, सौरभ राज जैन पसरवणार देशात शांतता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः ख्रिसमस हा भेटवस्तूंचा सण असे म्हणतात. या दिवशी सांताक्लॉज आपल्या गाडीवर येतो आणि  मुलांना भेटवस्तूंचे वाटप करतो.  या उत्सवात सर्वात उत्साही मुले असतात आणि रात्रभर त्यांच्या लाडक्या सांताची प्रतीक्षा करतात. या निमित्ताने आम्ही टीव्ही सेलिब्रिटींना विचारले की, जर त्यांना एका दिवसासाठी सांता बनण्याची संधी मिळाली तर ते काय करतील. टीव्ही सेलिब्रिटींनी भास्करकडे त्यांच्या इच्छा व्यक्त केल्या.

  • मोहित मलिक

ख्रिसमस हा देण्याचा सण आहे आणि जर मला एक दिवस सांता बनण्याची संधी मिळाली तर मी गरिबांना मदत करीन. मी बाहेर जाऊन कपडे, रुपये, घरे आणि जे काही त्यांना हवे आहे ते देईन.

  • शंतनू माहेश्वरी

जर मला एका दिवसासाठी सांताक्लॉज बनण्याची संधी मिळाली तर मी मुलांसाठी काहीतरी करेन. मुलांना बाहेर खेळायला प्रोत्साहित करण्यासाठी मी जास्तीत जास्त खेळाची जागा तयार करेन.

  • जूही परमार

मूलभूत सुखसोयीपासून दूर असलेल्या मुलांसाठी मला काहीतरी करायचे आहे. मला प्रत्येकासाठी मिठाई, खेळणी आणि बराच आनंद आणायचा आहे.  

  • वाहबज दोरबजी

हे वर्ष माझ्यासाठी खूप छान आहे. माझा विश्वास आहे की, प्रत्येकासाठी सर्वात महत्वाचे शांतता आणि आनंद होय. मी स्वत: ला समाजाच्या दबावांपासून दूर ठेऊन चांगले बनणे शिकलो आहे. जर कोणी माझ्या कथेद्वारे प्रेरित झाला तर मला खूप आनंद होईल.

  • सौरभ राज जैन

मला वाटते की, या देशात सर्वात जास्त शांतता असणे आवश्यक आहे. जर मला संधी मिळाली तर मी प्रेम, शांती आणि सद्भावना पसरवू इच्छितो.

बातम्या आणखी आहेत...