आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतीगिरी महाराजांसह अनुयायी लोकसभेच्या 8 जागा लढवणार, कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट केले नाही 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - देशात दडपशाही, हडपशाहीचे राजकारण सुरू असून त्याच्या शुद्धीकरणासाठी चांगली माणसे यात आली पाहिजेत. त्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी केली. 


त्यांनी राजकारण शुद्धीकरण अभियानांतर्गत जळगावात निर्धार सभा घेतली. या वेळी त्यांनी भक्तांना राजकारणाच्या शुद्धीकरणाची शपथही दिली. जनार्दन महाराज, स्वामी देवगोपाल महाराज, रजनीशपुरी महाराज, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. सभेपूर्वी दुचाकी रॅली काढण्यात आली. सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी प्रबोधन केले. या सभेत संतांनी सध्याच्या राजकारणावर प्रहार केला. जनार्दन महाराज म्हणाले, पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा असे राजकारण्यांचे समीकरण झाले आहे. देशात ८ याेगी खासदार झालेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही योगी निवडणुकीत उभे राहून राजकारणाचे शुद्धीकरण करतील. शांतीगिरी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी राजकारणात यावे, अशी भक्तांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शांतीगिरी महाराज व त्यांचे अनुयायी निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर करण्यात आले; परंतु कोणत्या जागा लढवणार हे मात्र जाहीर केले नसून, लोकसभेच्या आठ जागा लढवतील, असे या वेळी सांगण्यात आले. 


राजकारण शुद्धीकरणाची नागरिकांना दिली शपथ 
'मी लोकशाहीचा घटक, राजकारणाचे शुद्धीकरण मोहिमेचा प्रचारक, लोकशाहीच्या, राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मला असलेल्या संवैधानिक अधिकारानुसार गुन्हेगार नसणाऱ्या, नि:स्वार्थी, अखंडता जोपासणाऱ्या, देशनिष्ठेला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदान करीन. प्रलोभनाला बळी पडणार नाही. स्वत:ही मतदान करीन, इतरांनाही प्रवृत्त करीन,' या आशयाची शपथ शांतीगिरी महाराजांनी या वेळी नागरिकांना दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...