आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी शुक्रवारी भेट घेवून दर्शन घेतले.
श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यस्मरणार्थ (दी. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर) या महापर्वकालावर आयोजित करण्यात आलेल्या जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळयात सर्वप्रथम आमदार विनायक मेटे यांनी वेरुळ येथे हजर होत बाबाजिनचे दर्शन घेतले होते.
यानंतर शुक्रवारीही त्यांनी वेरुळ येथे जाऊन बाबाजीचे दर्शन घेत साधारण तासभर चर्चा केली. यावेळी विष्णुमहाराज, नियोजन मंडळाचे राजेंद्र पवार प्रमुख यांची त्याठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. ही चर्चा कोणत्या विषयावर झाली ते कळाले नसले तरी, स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी राजकारणाचे शुद्धिकरण हे जाहीर केल्याने या बैठकीकडे सध्या तरी राजकीय वर्तुळातुन पाहण्यात येत आहे. यावेळी मेटेंनी खुलताबाद तालुक्यातील शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण, युवासेना तालुकाध्यक्ष मछिन्द्र देवकर, दयानंद फुलारे, कडुबा जगताप, निवृत्त डीवायएसपी डॉ. कांचन चाटे, सुभाष जाधव, मराठवाडा अध्यक्ष सचिन मिसाळ, खुलताबाद तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दांडेकर, शहर अध्यक्ष अनिल नागे, तालुका सचिव अजिनाथ बोडखे, सचिन दांडेकर, नवनाथ जाधव, अमोल बोडखे, किशोर मालोदे, विलास बोडखे, संदीप दांडेकर, प्रवीण चव्हाण, विकास भोसले, मधुकर राठोड, जीतू राठोड, गजानन होळकर, सुनील मालोदे, संतोष तुरेवाले, अक्षय थोरहत्ते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिति होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.