आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Malhotra Married 2 Months Ago But Didn't Take Any Long Vacation Holiday For His Wife

दोन महिन्यांपूर्वी झाले होते शरद मल्होत्राचे लग्न, पण शोच्या शुटिंगमुळे पत्नीला देऊ शकत नाहीये पुरेसा वेळ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : अभिनेता शरद मल्होत्रा सध्या खूप परेशान आहे आणि याचे कारण आहे त्याचा शो 'मुस्कान'. असे नाही की, त्याला त्या शोमध्ये काम करायला काही प्रॉब्लेम आहे . पण तो शूटिंगच्या हेक्टिक शेड्यूलमुळे खूप नाराज आहे. ऐकण्यात आले आहे की, अभिनेत्याला पत्नीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. ज्यामुळे तो खूप चिंतित आहे. एवढेच काय तर त्याला त्याच्या इतर प्रोफेशनल कमिटमेंट्समध्येही खूप अडजस्टमेन्ट करावे लागत आहे. कारण आतापर्यंत शोच्या एपिसोड्सचे बिलकुल संग्रह झालेला नाहीये.  

 

घर आणि सेटमध्ये होत आहे त्याची ओढाताण...  
शरदने सांगितले, "माझे प्रोफेशनल लाइफ खूपच हेक्टिक सुरु आहे. मेकर्सकडे बँक एपिसोड्स नाहीयेत, ज्यामुळे मला प्रत्येक दिवशी शूट करावे लागते आहे. जर एक दिवसही शूट थांबले तर टेलीकास्टमध्ये खूप प्रॉब्लेम होतो. घरापासून सेट आणि पुन्हा सेटपासून घर एवढेच माझे रोजचे रुटीन झाले आहे."

 

'लग्नाच्या दोन महिन्यानंतरही नाही घेतली मोठी सुट्टी...'
त्याने पुढे सांगितले, "आमच्या लग्नाला दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ गेला आहे. पण मी कदाचितच एखादी मोठी सुट्टी घेतली असेल, पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ बॅलेन्स करणे खूप कठीण झाले आहे. पण असो त्याचे कुणी काही करूही शकत नाही. शोचा लीड अॅक्टर असल्यामुळे अशी अवस्था होते." शरदने 20 एप्रिल 2019 ला गर्लफ्रेंड रिप्सी भाटियासोबत लग्न केले होते. सेरेमनी शीख आणि हिंदू रीति-रिवाजाप्रमाणे झाली होती.

बातम्या आणखी आहेत...