आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा जिंकण्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजप मुद्दामहून हरली असेल, शरद पवारांनी व्यक्त केली शंका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी ट्विटरवर पोस्ट करत ईव्हीएमबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त केला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असतानाही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला पण लोकसभा निवडणुकीत मात्र त्याच ठिकाणी भाजपने घवघवीत यश संपादन केले. यावरून लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी हा पराभव मुद्दामहून स्वीकारला नाही ना अशी शंका मनात आल्याचे शरद पवारांनी म्हटले. 

 

 

शरद पवारांनी ट्वीट करत लिहिले की, 'ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासूनच शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.'  

 

पवारांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिले की, 'निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. आपले माझे मत हे बरोबर गेले आहे की नाही याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम आहे'