आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमधील हिंसाचाराला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार, शरद पवारांचा भाजपर गंभीर आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही म्हणून धार्मिक तेढ निर्माण केला'

मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधामुळे दिल्लीत मागील काही दिवसांपीसून सुरू असलेल्या हिंसाचारामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. आज(रविवार) शरद पवार मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिराचा समारोप भाषणात बोलत होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली दंगलीप्रकरणी पंतप्रधान यांची वक्तव्ये आणि गृहमंत्री हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असमर्थ ठरल्याचा आरोप केला. जी शक्ती देशाच्या ऐक्याला धक्का देण्यासाठी सरसावत आहे तिला दुर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असेही शरद पवार म्हणाले.

दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आहे. महत्वाचे राजधानी शहर आहे. दिल्लीच्या निर्मितीपासूनच भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह नव्हती सत्ता मिळण्याची चिन्ह दिसत नाही. त्यावेळी सांप्रदायिक पद्धतीचा आधार घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचे काम झाले आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला. 

पंतप्रधान, गृहमंत्री यांचा निवडणूकीत प्रचाराचा रोख पाहिला तर धार्मिक तेढ निर्माण करणारा होता. पंतप्रधान यांचे भाषण ऐकले तर लक्षात येते. देशाचं नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे बोलतात हे चिंताजनक आहे असेही शरद पवार म्हणाले. मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरण्याऐवजी गोळी मारण्याची भाषा करतात हे भाजपाचे नेते करताना दिसले. दिल्लीच्या शाळेवरही हल्ला केला गेला. शैक्षणिक वस्तू उध्वस्त केल्या गेल्या. शैक्षणिक संस्थेतसुद्दा हल्ला करण्यासाठी भक्तांच्या मदतीने पावले टाकली जात आहेत याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

राष्ट्रपती दिल्लीत येतात आणि त्याच राज्यात दंगली होतात आणि देशाच्या भल्याची वक्तव्य केली जातात असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. 
सांस्कृतिक राजधानी उध्वस्त करण्याचे काम करणाऱ्या शक्तीला या निवडणुकीत बाजुला करण्याचे काम झाले आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. ऐक्याचे चित्र त्यांना बघवत नाहीय. समाजासमाजात आग लावण्याचे काम होत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला. 

आजचे राज्यकर्ते धर्म... जातीचा आधार घेऊन फुट पाडण्याचे काम करत असतील तर दुहेरी शक्ती पुढे सरसावत असतात. त्यामुळे ही जातीय शक्ती घालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अग्रभागी असेल असे शरद पवार यांनी सांगितले.  देशात सांप्रदायिक विचार रुजवले जात आहे. दिल्लीची अधिकाराची सीमा कमी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जसे आहेत तसे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाही. ती सगळी जबाबदारी गृहमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही असा आरोप शरद पवार यांनी केला. 

उद्योग अडचणीत आहेत बेरोजगारी वाढली आहे असे चित्र आज देशात आहे. भविष्याची चिंता यांना नाही. ज्या पक्षाला 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या पक्षाचे सरकार काही राज्यात राहिले नाही. महाराष्ट्रात सरकार आले नाही. देशाच्या हिताचा मक्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिला ही भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे असेही शरद पवार म्हणाले.

जिथे अन्याय अत्याचाराची भिंत उभी करुन जातीयवाद... दंगलीवाद निर्माण करणारी शक्ती आहे तिला खड्यासारखे बाजुला करायचे आहे असे आवाहन शरद पवार यांनी केले.  पहिल्या दिवसापासून भाजपाची निती आपल्या सहकाऱ्यांना बाजुला करण्याची होती याची जाण शिवसेनेला आली. बाळासाहेब ठाकरे यांनी एकवेळ गांधींना पाठिंबा देवू अशी भूमिका घेतली होती याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली. 

तुमच्या सर्वांच्या सामर्थ्यावर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे काम केले. सत्ता प्रस्थापित करता आली. पक्ष कसा मजबुत करता येईल. देशात भ्रष्टाचाराने निर्माण झालेली जी व्यवस्था आहे ती होणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात अजून काम करण्याची गरज आहे. नव्या लोकांना संधी दिली गेली नाही असे सांगितले जाते. म्हणून सांगू इच्छितो की, शिबीर घेतले ठिक आहे परंतु मजबुत संघटना बांधली पाहिजे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते... त्यामुळे नव्यांना संधी दिली पाहिजे. तो कार्यक्रम असला पाहिजे. नवाब मलिक हे चांगले काम करतील. शक्तीशाली पक्ष कुठे असेल तर मुंबईत असे काम करा असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. 

बातम्या आणखी आहेत...