आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी केली राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; तर काँग्रेस 20 सप्टेंबर रोजी करणार 50 उमेदवारांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान बीड दौऱ्यात पवार यांनी बीडच्या पाच उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेस देखील 20 सप्टेंबर रोजी आपल्या 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.  
 
परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई -  विजयसिंह पंडित, केज - नमिता मुंदडा, बीड - संदीप क्षीरसागर, माजलगाव - प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. तर आष्टी मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
 

नातलगांमध्ये लढत पाहायला मिळणार 
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्याची लढाई पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. तर महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होणार आहे. 
 

जयदत्त क्षीरसागरांवर केली टीका 
दरम्यान शरद पवार यांनी या दौऱ्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या टीका केली. तुम्ही विकास करण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेला आहात तर मग पंधरा वर्ष मंत्रीपदी असताना तुम्ही नेमकं काय केलं असा सवालही शरद पवारांनी विचारला. केशरबाई क्षीरसागर यांनी गांधी-नेहरूंचा विचार कधी सोडला नाही. मात्र त्यांच्या पोराने स्वार्थासाठी आम्हाला सोडले असं म्हणत पवारांनी क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. संदीप क्षीरसागर यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन शरद पवारांनी केले.