Home | Maharashtra | Mumbai | Sharad Pawar are the NCP candidate from Madha constituency for Loksabha? 

लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून शरद पवारच राष्ट्रवादीचे उमेदवार? रणनीती आखण्यासाठी मुंबईत आयोजित बैठकीत निर्णय 

विशेष प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 07:59 AM IST

मात्र, या निर्णयाला अद्याप शरद पवार यांनी दुजोरा दिलेला नाही.

  • Sharad Pawar are the NCP candidate from Madha constituency for Loksabha? 

    मुंबई- लोकसभेच्या माढा मतदारसंघातून शरद पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. माढ्यातील रणनीतीबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठकीत दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय झाल्याची माहिती आहे.

    माढातून उमेदवार निश्चित करण्यासंबंधी मुंबईत झालेल्या बैठकीत या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेले विजयसिंह मोहिते व त्यांच्या समर्थकांशी चर्चा करण्यात आल्याचे कळते. मात्र, या निर्णयाला अद्याप शरद पवार यांनी दुजोरा दिलेला नाही. निंबाळकरांसह माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, दीपक आबा साळुंखे आणि रश्मी बागल बैठकीला उपस्थित होते.

    राज ठाकरे-अजित पवार यांच्यात दीड तास गोपनीय चर्चा
    लोकसभा लढवण्याबाबत द्विधा मन:स्थितीत असलेल्या राज ठाकरेंची बुधवारी अजित पवार यांनी भेट घेतली. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेनेही आघाडीत आले पाहिजे, अशी भूमिका मांडणाऱ्या अजित पवारांनी दुसऱ्याच दिवशी राज यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Trending