आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारी तळपायच्या, त्या किल्ल्यांत आता छमछम; शरद पवार यांची नगरमध्ये भाजप सरकारवर टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर  - छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला राज्यातील भाजप सरकारने सुरुवात केली आहे. त्यामुळे या किल्ल्यात तलवारी ऐवजी 'बार आणि छमछम' सुरु करणार का? असा घणाघाती प्रहार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. नगर येथील नंदनवन लॉन्स येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते.

आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. पवार म्हणाले, भाजप एकवेळ उद्योगपतींचे कर्ज माफ करेल. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात. मग शेतकऱ्यांनी यांचे काय घोडे मारले? शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू आहे. त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी झोपेत आहेत का, हे समजायला कारण नसल्याचे ते म्हणाले. 
 
३७० कलम रद्द केले त्याबद्दल अभिनंदन पण ३७१ नुसार नागालंड, मणिपूर व इतर आठ राज्यात देशातील अन्य राज्यातील नागरिक जमीन घेऊ शकत नाही. तेथे बदल का नाही?काश्मीरमध्ये एका धर्माचे लोक राहतात म्हणून तेथील 370 कलम रद्द केले का ? असा सवालही पवार यांनी यावेळी केला.