आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यासारख्यावर खोटा गुन्हा दाखल केला, मग सर्वसामान्यांचे काय हाल - शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विद्यमान सरकारच्या कारभारापासून सुटका करण्याची वेळ आलीय. परत इतकी चांगली संधी मिळणार नाही. या संधीचे सोने करत युती सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारासाठी  बुटीबोरी येथे आयोजित सभेत केले. 

पवार म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले होते. ते परतवून लावणे आवश्यक होते. सुरक्षेसंबंधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय सार्वमताने घेण्यात आला. हवाई दलाने अभिमान वाटावी अशी कारवाई केली. मात्र त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा लाभ मोदी सरकारने घेतला. पुलवामा आणि ३७० चा लाभ घेऊन सत्ता येणार नाही, हे सरकारने लक्षात ठेवावे, असे पवार म्हणाले. सरकार सत्तेचा गैरवापर करतय. चिदंबरम यांना तुरुंगात टाकले. िवनाकारण माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आज माझ्यासारख्यावर खोट्या गुन्हा दाखल केला. मग सर्वसामान्यांचे काय हाल होतील, असा सवाल पवार यांनी केला. इंदिरा गांधींच्या काळातही युद्ध झाले होते. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकूनदेखील श्रेय घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
 

पवारांच्या सभेत विजेची चोरी!
वर्धा | शरद पवार यांच्या हिंगणघाट येथे जाहीर सभास्थळी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी विजेची चोरी केल्याने वितरण विभागाने कारवाई केली आहे. आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ शरद पवार आले होते. या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी चक्क विजेची चोरी केली होती. ते वितरण विभागाच्या लक्षात येताच त्यांनी वीज चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. आयोजकांवर कारवाई होणार असल्याचे  सहाय्यक अभियंता एच.एम. पाटील म्हणाले. 
 

गडकरींच्या कामांची पवारांकडून स्तुती

यवतमाळ - पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, ‘नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री विदर्भातील आहे. दोन महत्वाची खाती विदर्भात असतानाही येथील रस्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. यामुळे ‘खड्डेयुक्त रस्ता‘ असे धोरण सरकारचे असावे अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.’

बातम्या आणखी आहेत...