आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी आपलं राज्य धनिक होतं आणि आज राज्याची अवस्था काय आहे यावर न बोललेलं बरं - शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगणघाट - एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी केली जायची. पण मागील पाच वर्षात या सरकारने राज्यावर ४ लाख कोटी रुपयाचे कर्ज करून ठेवले आहे. यातून राज्याचा विकास किती केला यावर न बोललेले बरं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगणघाट येथील जाहीर सभेत सरकारला लगावला. आपल्या राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या हातून सत्ता काढून घेण्याचे काम या विधानसभा निवडणुकीत करायचे आहे असे आवाहन शरद पवार यांनी केले.

अद्यापही ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही
आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना कपाशीला ७ हजार भाव देण्याची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यावर यांनी पाच वर्षात कपाशीला एकदाही ७ हजाराचा भाव दिला नाही. या भागात अतिवृष्टी झाली पीकविमा काढून देखील पैसे मिळाले नाही. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. यामुळेच शेतकरी समाज उध्वस्त झाला हे चित्र पाहायला मिळत आहे आणि हे चित्र आपल्याला बदलायचे आहे असेही शरद पवार म्हणाले. 

शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला या सरकारचा नकार आहे. आपल्या राज्यात कांद्याला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

या सरकारने खड्डेमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार केला आहे
राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर आज खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. आम्ही खड्डेमुक्त राज्य घडवण्याचा संकल्प केला होता मात्र या सरकारने खड्डेमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार केला आहे. यात अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले पण या सरकारला याचे गांभीर्य नाही अशी जोरदार टीकाही शरद पवार यांनी केली. 

कामगार देशोधडीला लागला
हिंगणघाट म्हणजे कापुस. हजारो कामगार काम करत होते. आज काय अवस्था. कापडाचे आगार असलेल्या मुंबई मध्ये गिरण्या बंद पडल्या. कामगार देशोधडीला लागला तेच चित्र आज हिंगणघाट मध्ये पाहायला मिळत आहे असेही शरद पवार म्हणाले.आजच त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय घोडमारे यांच्या प्रचारासाठी नागपूर जवळील बुटीबोरीत सभा घेतली


यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "विद्यमान सरकारच्या कारभारापासून सुटका करण्याची वेळ आली आहे. सुरक्षेसंबंधी निर्णय सार्वमताने घेण्यात आला. पण, हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याचा लाभ या सरकारने घेतला. पुलवामा आणि 370 चा लाभ घेऊन सत्ता येणार नाही. राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारला त्याचे काही वाटत नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे आश्वासन दिलो होते, पण तसे केले नाही." आता यापुढे कुटुंबातील एकाने शेती आणि एकाने मिळेल तिथे नोकरी करावी." असा सल्लाही पवारांनी उपस्थितांना दिला. पुढे म्हणाले की, "औद्योगिक वसाहतीत कारखाने बंद आहे. 16 हजार कामगारांना नोकरीवरुन काढून टाकले. जेट विमान कंपनी बंद पडली. 22 हजार नोकऱ्या गेल्या. सध्या देशात मंदीचा फेरा सुरू आहे. सध्या सत्तेचा गैरवापर सुरु आहे. चिदंबरम यांना तुरूंगात टाकले. कारण नसताना माझ्या सारख्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मग सर्वसामान्यांचे काय हाल होतील. हे सरकार महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहे."  पण, या सरकारला फक्त 370 आणि काश्मीरवच बोलयाचे आहे. त्यांना जनतेबद्दल काहीच वाटत नाही."

बातम्या आणखी आहेत...