आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तारीखला कर्जत जामखेडचा 'भाजपचा राम' शिल्लक राहिला नाही अशी वर्तमानपत्रांची हेडलाईन असेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत-जामखेडः कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाईन 24 तारखेला वर्तमानपत्रांची असेल असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शनिवारी कर्जतच्या सभेत बोलत होते. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. दरम्यान महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरु आहे. या तरुणाने भाजपची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन - तीन सभा कर्जत- जामखेडमध्ये घेत आहेत असा टोलाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

नव्या पिढीला काम नाही आणि काम आहे ते कारखाने, कंपन्या बंद होत आहेत अशा पध्दतीची भाजपाची राजवट सुरु आहे असेही शरद पवार म्हणाले. 52 वर्षापुर्वी मी आज रोहित ज्या वयात आहे त्या वयात मी विधानसभेला उभा होता. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलला. परिवर्तन झालं. रोहितने कर्जत- जामखेडची गेली पाच वर्षे जबाबदारी घेतली आहे. या गावाची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडीत नेहरु, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने याविभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द शरद पवार यांनी यावेळी जनतेला दिला.

रोहित पाच वर्षांत विकासकामे, प्रकल्प देतील त्याला साथ आणि त्याची दृष्टी असेल तर बारामतीला विकास व्हायला २० वर्षे लागली परंतु रोहित ते पाच वर्षांत करुन दाखवेल याची मला खात्री आहे असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. देशाला कळु दे कर्जत- जामखेड ही वेगळी चीज आहे हे दाखवुन द्या असे आवाहनही शरद पवार यांनी केले.