आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांनी माफ केले! मला मंत्रिमंडळात घेणार की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील -अजित पवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवार यांना माफ केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार निश्चित झाले असताना अचानक काही आमदारांना घेऊन अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. हा बंड शांत करण्यासाठी पवार कुटुंबियांनी अजित पवारांच्या अनेक भेटी घेतल्या. त्याला मंगळवारी यश आले आणि अजित पवारांनी राजीनामा दिला. यानंतर भाजपचे 4 दिवसांचे सरकार पडले.

मला मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंवर -अजित पवार

यावर सविस्तर माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, "शेवटी, अजित दादांनी आपली चूक मान्य केली. हा एक कौटुंबिक मुद्दा असून पवार साहेबांनी त्यांना माफ केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतील. पक्षात असलेली त्यांची भूमिका आणि प्रतिष्ठा बदलणार नाही." वृत्तसंस्थेशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते बोलत होते. दरम्यान, अजित पवारांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच आहोत असे स्पष्ट केले. "यापूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि यापुढेही पक्षातच राहील. राष्ट्रवादीने मला पक्षातून काढलेले नाही. मी राष्ट्रवादीचाच आहे." यासोबतच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याचा निर्णय आता भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असेही अजित पवार यांनी सांगितले.


अजित पवारांचा बंड शांत झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. यासोबतच, राष्ट्रवादीने आपला गटनेता म्हणून जयंत पाटील यांची निवड केली. आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून मुख्यमंत्री होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला अडीच-अडीच वर्षांचे उपमुख्यमंत्री पद आले आहे.

बातम्या आणखी आहेत...