आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छत्रपतींच्या नावाने जे जे केलं ते या सरकारने पुर्णत्वाला नेलं नाही', शरद पवार नाशिकमधील सभेत सरकारवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- "इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये नव्या पिढीतील मुलामुलींना शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजावे म्हणून एक धडा होता, आता तो धडाच सरकारने काढून टाकला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा धडा नव्या पिढीला देवून एकप्रकारची जिद्द तयार करण्याची कल्पना मागच्या सरकारच्या मनात होती, तो धडाच काढून टाकला आणि सांगतात शिवरायांचे विचार घेवून हे राज्य पुढे घेवून जाणार आहोत." असा टोला लगावतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे जे काही केलं ते पुर्णत्वाला नेलं नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नांदगाव येथील जाहीर सभेत सरकारवर केला.

"इयत्ता चौथीच्या पुस्तकातील छत्रपतींचा इतिहास सांगणारा धडा सरकारने काढून टाकल्याचा मुद्दा शरद पवार यांनी या सभेत उचलुन धरताना सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.  मागच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री जाहिरात देत होते छत्रपतींचे आशिर्वाद घेवून आम्ही राज्य करतो. मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असे उभारू की जगाला त्याचा हेवा वाटेल. आम्हीही पाठिंबा दिला, पंतप्रधान आले जलपूजन केले, तीन वर्षात हे स्मारक पुर्ण होणार होते. पण, आज पाच वर्षे झाली, एक इंचभरही काम झालं नाही. हे यांचं छत्रपतींविषयी प्रेम" असा जबरदस्त टोला शरद पवार यांनी लगावला.
"शिवरायांनी शौर्य दाखवलेल्या गड किल्ल्यांवर पर्यटन उभे करण्याचा संकल्प या सरकारने केला आहे. छत्रपतींच्या शौर्याचा अभिमान महाराष्ट्र बाळगतो ते किल्ले दारुचे अड्डे बनवताय, बार टाकताय. आज ना उद्या बार आल्यामुळे त्याठिकाणी डान्सबार येणार, त्याची पार्श्वभूमी तयार सरकार करत आहे. कुणासाठी सत्ता चालवता, या लोकांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही," अशी जोरदार टीकाही शरद पवार यांनी केली. 
"जे सरकार कष्टकरी जनतेच्या पाठिशी रहात नाही, जे त्याच्या हिताची जपणूक करत नाही त्यांना अक्कल शिकवण्याची गरज आहे," असेही शरद पवार म्हणाले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा आज पार पडली. राज्यकर्ते हे लोकांच्या समस्यांसाठी संवेदनशील असले पाहिजेत परंतु आजचे सरकार लोकांसाठी संवेदनशील नाहीत असेही शरद पवार यांनी सांगितले. या जिल्हयात मला असं चित्र दिसतंय की, १९८५ साली जसे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून दिले होते तेच चित्र आज मला दिसतंय असेही शरद पवार म्हणाले.