आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : ठाणे जिल्ह्यातील वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात सोडणे व पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवून मराठवाड्यासह दुष्काळ व टंचाईग्रस्त भागातील पाणी समस्येवर कायमचा तोडगा काढण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जलसंपदा विभागाला केल्या.
शनिवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात विशेष बैठक घेऊन पवार यांनी एकूण पाणीप्रश्नाचा सविस्तर आढावा घेतला. यात जलसंपदामंत्री जयंत पाटील, विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल उपस्थित होते. बैठकीत पवारांनी दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्प व नार-पार, तापी, नर्मदा नदीजोड या आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाची स्थिती, पाणीवाटपाच्या सूत्राबाबतची माहिती जाणून घेतली.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत दहा जिल्ह्यांत १०५ तालुके आहेत. या महामंडळांतर्गत आता सुमारे ३.७६ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करायची आहे.
गोदावरी-गिरणा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याला
मराठवाड्याची पाणी समस्या, नाशिक जिल्ह्यातून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे कसे वळवता येईल, गोदावरी-गिरणा खोऱ्यातून मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत राज्य सरकारचे प्राधान्य राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यातील काही भागातील सिंचनाचा प्रश्नही मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, यासंदर्भात पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.