आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यावर आराेपांमुळे अजितदादा अस्वस्थ; आता शेतीच करावी असे मुलांना सुचवले : शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे | ‘ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मी त्यांना, कुटुंबीयांना संपर्क साधला. अजित पवार यांच्या मुलांशी चर्चा झाली. त्या वेळी ‘काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी अस्वस्थ आहे,’ असे अजित यांनी मुलांना सांगितल्याचे कळले. त्याचमुळे त्यांनी (दादांनी) राजीनामा दिला असावा,’ अशी शक्यता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली. ‘अजित पवार त्यांच्या मुलांना म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात काकांचं (शरद पवारांचं) नाव आल्याने अस्वस्थ झालोय. राजकारणाची पातळी घसरली असल्याने मी राजकारणातून बाहेर पडून शेतीवर लक्ष केंद्रित करतो आणि तूही व्यवसायावर लक्ष केंद्रित कर,’ असा सल्ला अजितदादांनी आपल्या मुलांना दिला,’ अशी माहिती माझ्याकडे आहे. 

काैटुंबिक कलह नाहीच - ‘कौटुंबिक कलहातून अजित पवार यांनी राजीनामा दिला का?’ या प्रश्नावर पवार म्हणाले, पवार कुटुंब एक आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून आमच्या कुटुंबात प्रमुखाचा निर्णय अंतिम असताे. मी अजित पवार यांची भेट घेणार आहे.