आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Sharad Pawar Never Went To Jail For Doing Bad', Sharad Pawar Reply To Amit Shah Comment In Solapur

'मी बर वाईट केलं म्हणून कधी तुरुंगात गेलो नाही', अमित शहांच्या 'त्या' विधानावर पवारांचा पलटवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी सोलापुरात शरद पवारांवर टीका केली होती. "शरद पवारांनी एवढ्या वर्षात काय काम केले?" असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर आता शरद पवारांनी पलटवार केला आहे. पवार म्हणाले की, "शरद पवार बर वाईट केले म्हणून कधी तुरुंगात गेला नव्हता. तुरुंगात गेलेल्यानी सांगू नये की शरद पवारांनी काय केले? मी मुख्यमंत्री असताना सकाळी 7 वाजता किल्लारीत होतो. आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने करतात आणि अर्धा तासात गायब होतात. राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी राहावे लागते. कारण, त्याशिवाय यंत्रणा हालत नाही." अशा शब्दात त्यांनी शहांचा समाचार घेतला.

शरद पवार पुढे म्हणाले की, "मी काय म्हातारा झालो आहे का? अजून लई जणांना घरी पाठवायचेय. ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित असलेल्या तरुणाईच्या जोरावर पाठवायचेय. म्हणून मी घरी सांगून आलो की, आता घरचे तुमच्या तुम्ही पहा. मला काही लोकांच्याकडे बघायचय." असे म्हणत उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली.
पवार पुढे म्हणाले की, "माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून झाली. 1965 साली राज्यातील तरुणांचे नेतृत्त्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझाकडे होती. सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात. गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता. गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत." असे म्हणत मोहिते पाटील, दिलीप सोपलांवर नाव न घेता टीका केले.

बातम्या आणखी आहेत...