आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊन दादांना ‘चेक’! वळसे पाटील विधानसभा अध्यक्ष, थाेरात उपमुख्यमंत्री?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई | विधानसभा अध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे राहील, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरले हाेते. मात्र शुक्रवारी या पदांची अदलाबदल करण्यात आली. कारण उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळाले तरी ते जयंत पाटील यांना देण्यास शरद पवार अनुकूल हाेेते. मात्र अजित पवारांचा या पदावर दावा आहे, त्यांचे समर्थकही आग्रही हाेते. त्यामुळे आता राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद व काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद, असा मध्यममार्ग शुक्रवारी दुपारी शरद पवार व काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या बैठकीतून काढण्यात आला. 

उपमुख्यमंत्रिपदच पक्षाकडे नसल्याने अजित पवारांच्या नाराजीचा प्रश्नच राहणार नाही व पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अध्यक्षपदही जाणार नाही, अशी खेळी पवारांनी खेळल्याचे मानले जाते. वळसे पाटलांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. 

मात्र, ‘उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील,’ असे अजित पवारांनी पत्रकारांना ठामपणे सांगितले. त्यामुळे अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सत्तावाटपाचा पेच सुटला नसल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षही उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. मात्र हे पद हवे असल्यास विधानसभा अध्यक्षपद मिळणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले हाेते. त्यामुळे काँग्रेसनेही अध्यक्षपदावर पाणी साेडून उपमुख्यमंत्रिपद घेण्यास मान्यता दिल्याचे समजते. बाळासाहेब थाेरात यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे.

बातम्या आणखी आहेत...