आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी कार्यालयात जाणार नाही, विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न - शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिखर बँकेच्या कथित घोटाळ्यात ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आपण चौकशीसाठी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे शरद पवारांनी ठरवले होते. परंतु मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या बंगल्यावर जाऊन शरद पवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 

विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

शरद पवार यांनी यावेळी राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली.' माझा बँकेशी कसलाही संबंध नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा जनतेमध्ये मलिन करण्याचा हेतू सत्ताधाऱ्यांचा होता. यामुळे जनतेमध्ये संताप होता. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत होते. 
 

संजय बर्वेंच्या भेटीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा पवारांचा निर्णय 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आपण ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचा पवित्रा पवार यांनी घेतला होता. त्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर चुकीची घटना घडू नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यामुळे ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे पवार माध्यमांसमोर म्हणाले.  

तूर्तास चौकशीची गरज नाही, ईडीचा शरद पवारांना मेल

ईडीने शरद पवार यांना सध्या तुमच्या चौकशीची गरज नसून येण्याची काही गरज नसल्याचे सांगितले. यासोबतच भविष्यात गरज लागेल तेव्हा तुम्हाला आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही येऊ शकता असेही सांगिलते.