आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जातीच्या नावाने वस्ती नको, त्याची नावे बदलावीत : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राज्यात कुठेही जातीच्या नावाने वस्ती नको, त्याची नावे बदलावीत असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत या विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांना दिला. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे आणला जाणार आहे. तसेच एक संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपणाला करायला हवी असे मतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख डॉ. जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आज राज्याच्या मंत्रीमंडळात सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर आहे. धनंजय मुंडे हे चांगले संघटक आहेत त्यामुळे ते समाजातील सर्वच घटकांना न्याय देतील. आपण संघटना म्हणून सर्वांना जोडण्याची भूमिका घ्यावी.

धनंजय मुंडे म्हणाले, या विभागातून नेमके किती आणि काय काम करू शकतो याचा अंदाज मागील १५ दिवसात आला आहे. राज्यातील २२.५ टक्के लोकांशी थेट संबंध येतोय हे माझे भाग्य आहे. हे फार मोठे आव्हान आहे आणि यासाठी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...