आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गुजरातचा विकास काँग्रेसच्या काळातील, मोदींच्या कार्यकाळात विकास दर घसरला\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणार्‍या भाजपचे देशासाठी योगदान नाही. केवळ जातीयवाद पसरवण्याचे काम या पक्षाकडून होत आहे. अशा जातीयवादी शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केले.
काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी परतवाडा येथील परेड ग्राउंडवर आयोजित सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात गुजरातमध्ये दंगली झाल्या. यात अल्पसंख्याक समुदायाच्या खासदाराला जिवंत जाळण्यात आले. त्यांच्या पत्नीला न्याय मिळत नाही. अशा धर्मांध शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. मोदी गुजरातच्या विकासाचा ढोल बडवत आहेत. वास्तवात हा विकास माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी, अरविंदसिंह सोलंकी, चिमणभाई पटेल यांच्याच कार्यकाळात झाला. विकासाचा वाढलेला दर मोदींच्या कार्यकाळात मात्र घसरला आहे. महाराष्ट्र कृषिमाल उत्पादनासह भांडवली क्षेत्रात अव्वल, तर गुजरात सहाव्या क्रमांकावर आहे. केवळ गुजरातच्या विकासाच्या नावावर मोदी पंतप्रधानपदाचे स्वप्न रंगवत असल्याचे ते म्हणाले. सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आमदार केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, रवि राणा, नगराध्यक्ष अरुण वानखडे, जोगेंद्र कवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली.

पुढील स्लाइडमध्ये, शेगावच्या सभेत उघड झाला काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अविश्वास