आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर तुम्हाला सरकार चालवण्याचा काही अधिकार नाही, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - शेतकऱ्यांचा आत्महत्या रोखता येत नसतील तर तुम्हाला सरकार चालवण्याचा काही अधिकार नाही असा घणाघात शरद पवार यांनी केला. पुतण्या अजित पवार यांच्या प्रचारासाठी काका शरद पवार यांची बारामतीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. बालेकिल्ल्यातील या सभेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सांगता झाली. यावेळी पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत तुम्ही 5 वर्ष काय केले असा सवाल केला आहे.
 

... तर तुम्हाला सरकार चालवण्याचा अधिकार नाही -  शरद पवा
भाजप - सेना युतीच्या सरकारने पाच वर्षात काय केले? सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, पण उद्योगपतींची कर्जे मात्र माफ करतात. भाजप-सेना युतीचे सरकार शेतकरी आणि गरिबांचे नाही तर उद्योगपतींचे आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यभरात सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येत नसतील तर तुम्हाला सरकार चालवण्याचा काही अधिकार नसल्याची टीका शरद पवारांनी केली. . 
 

काय म्हणाले शरद पवार?

ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर खटले दाखल करायची. कुठल्यातरी लोकांच्या आदेशाचा वापर करून खटले दाखल केले जात आहेत त्यांना सांगून ठेवतो या सर्व खटल्यांना हा बारामतीकर पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं ते करा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

21 जिल्हयात जावून आलो त्यावेळी तरुण पिढी माझ्या समोर होती. पाच वर्ष भाजपचं राज्य पाहिलं. समाजातील एकही घटक समाधानी नाही. शेती कारखानदारी, कामगार अल्पसंख्यांक, कुणाच्याही हिताची जपणूक झालेली नाही असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकांच्या मनात सरकारबद्दल राग आहे. मुख्यमंत्री सांगतात आमच्याकडे उमेदवार नाही. कुस्ती खेळणारा नाही. रेवडया हे इनाम मिळायचे याचा किस्साही शरद पवार यांनी यावेळी सांगितला. 

या सरकारला पाच वर्षांत काय केलं हे विचारा. आजपर्यंत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारला लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवालही शरद पवार यांनी केला. 

70 हजार कोटीचे कर्ज आम्ही माफ केले. व्याज कमी केलं यांनी काय केलं. बारामतीत कारखाने आणून तरुण मुलांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम केले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. 

बेकारी वाढतेय... कारखाने बंद पडत आहेत याची जबाबदारी कुणाची आहे तर ती सरकारची आहे मात्र ही जबाबदारी सरकार घेत नसल्याने देशात आणि राज्यात बेरोजगारी वाढत आहे असेही शरद पवार म्हणाले. 

सत्तेचा गैरवापर करतोय त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. त्यासाठी आपल्या माणसाच्या घड्याळावर व आघाडीच्या उमेदवाराचे बटण दाबून बदल घडवूया असे आवाहन शरद पवार यांनी केले. 

महाराष्ट्रातील निवडणूक तरुणांनी ताब्यात घेतली आहे हे चित्र आहे. तरुणांचा दर्या आमच्या बाजुने आहे आणि संपत्तीचा डोंगर भाजपकडे आहे हा डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद  तरुणांमध्ये आहे तो गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी दिला. 

याअगोदर दादाला 1 लाख मताधिक्याने निवडून दिलंत आता दोन लाख मताधिक्याने निवडून देणार आहात. त्यामुळे यावेळी राज्याचा नाही तर देशाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे असे आवाहन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. 

हे इंजेक्शन संघर्षाचे आहे... ज्यावेळी पवारसाहेब सभास्थळी येतात त्यावेळी कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला अशी घोषणा दिली जाते परंतु बारामतीकरांना सांगते ते पहिल्यांदा माझा बाप आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. 

परिवर्तन होणार आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे हे निर्विवाद सत्य आहे असा विश्वास सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला. 

साताऱ्यामध्ये पवारसाहेबांचे कालचे भाषण बघून काय वाटले तर दिल्लीच्या तख्तासमोर खंबीरपणे जर कुठला सह्याद्री उभा राहू शकतो तो म्हणजे शरद पवार हे नाव आहे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. 

या बारामतीत जन्माला आलेला पुत्र हा देशातील कुठल्याही दिल्लीच्या तख्ताला घाबरत नाही...आरे ला कारे म्हणणारा कोण असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार आहेत त्यामुळे तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असाच ठेवा असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...