आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांसाठी आम्ही सरकार बनवले- उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार म्हणाले- हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रामध्ये आता भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी सांगितले की, "शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने भाजपला समर्थन दिले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून कोणताही पक्ष सत्तास्थापन करू शकत नव्हता, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अडचणींसोबतच इतरही प्रश्न निर्माण झाले होते. यामुळे आम्ही स्थिर सरकार बनवण्याचा निर्णय घेतला." अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 22 आमदारांसोबत भाजपला समर्थन दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

या सर्व राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवारांच्या या निर्णयाला वयक्तिक निर्णय सांगिलते आहे. भाजपला पाठिंबा देण्याच निर्णय राष्ट्रवादी पक्षाचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवारांच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...