आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar Sonia Gandhi; Maharashtra Govt Formation Latest Update, NCP Chief Sharad Pawar To Meet Congress President Sovia Gandhi

सत्ता स्थापनेबाबत सोनिया गांधींशी चर्चा झाली नाही, पत्रकार परिषदेत शरद पवारांची माहिती  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेनेची चिंता वाढवली

नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या निवास्थानी दाखल झाले. तिथे शरद पवार आणि सोनिया यांच्यात महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर जवळपास 50 मिनीटे चर्चा झाली. भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला.

शरद पवार म्हणाले की, "सोनिया गांधी आणि ए के अँटोनी यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील स्थिती सोनिया गांधी यांना सांगितली. या परिस्थितीवर लक्ष ठेवू, वरिष्ठ नेत्यांचे मत घेऊन पुढील रुपरेषा ठरवू. अद्याप शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचे की नाही? यावर चर्चा झाली नाही." असे शरद पवारांनी स्पष्ट केले.  पुढे ते म्हणाले की, "भाजपने काय करावं हा त्यांचा निर्णय आहे. आमच्याकडे सहा महिने वेळ आहे. शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा सोनिया गांधी यांच्यासोबत झाली नाही. बैठकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सोबत निवडणूक लढलेल्या मित्रपक्षांसोबत चर्चा झाली. सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नाही, त्यामुळे शिवसेनेबद्दल काही सांगू शकत नाही. आम्ही छोट्या पक्षांना नाराज करणार नाही, आम्ही समाजवादी पार्टी, स्वाभिमानी यांच्याशीही चर्चा करणार आहोत."    शरद पवार आणि सोनिया गांधींची बैठक आधी रविवारी ठरले होती, पण किमान समान कार्यक्रम ठरला नसल्याने कालची बैठक रद्द करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, "सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर सत्ता स्थापनेची स्थिती स्पष्ट होईल. त्यानंतर उद्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा होईल."