आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : पवारांचा थेट वार! राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांना सोलापुरात अप्रत्यक्ष भरला दम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राष्ट्रवादी सोडून जे गेले, ते लवकरच इतिहासजमा होणार आहेत. त्यांच्याविषयी फार चर्चा करू नका. मावळत्यांची काळजी  नको, उगवत्यांचे स्वागत करा. राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात मी सोलापुरातून केली आहे. तरुण पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच महाराष्ट्रातील जनतेला विश्वास द्यायचा आहे. यामुळे मी घरच्यांनाही सांगितलं आहे, “तुमचं तुम्ही बघा, आता मला काही लोकांकडे बघायचं आहे,’ असा अप्रत्यक्ष दमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना भरला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पवार यांनी राज्य दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून केली. पदाधिकारी मेळाव्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देत सत्तेसाठी लाचार होऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांचाही पवारांनी समाचार घेतला. सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. 
किल्लारी भूकंप पहाटे ३.३० वाजता झाला. मी सकाळी ७ वाजता तेथे पोहचलो. तातडीने मदत देत एक वर्षात १ लाख घरे बांधून दिली. आपत्तीच्या ठिकाणी राज्यप्रमुखाने थांबून पुनर्वसन केले पाहिजे. तसे होताना दिसत नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी सोडून जे गेले, ते लवकरच इतिहासजमा होणार आहेत. त्यांच्याविषयी फार चर्चा करू नका. मावळत्यांची काळजी  नको, उगवत्यांचे स्वागत करा. राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात मी सोलापुरातून केली आहे. तरुण पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच महाराष्ट्रातील जनतेला विश्वास द्यायचा आहे. यामुळे मी घरच्यांनाही सांगितलं आहे, “तुमचं तुम्ही बघा, आता मला काही लोकांकडे बघायचं आहे,’ असा अप्रत्यक्ष दमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना भरला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पवार यांनी राज्य दौऱ्याची सुरुवात सोलापुरातून केली. पदाधिकारी मेळाव्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देत सत्तेसाठी लाचार होऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांचाही पवारांनी समाचार घेतला. सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. 
किल्लारी भूकंप पहाटे ३.३० वाजता झाला. मी सकाळी ७ वाजता तेथे पोहचलो. तातडीने मदत देत एक वर्षात १ लाख घरे बांधून दिली. आपत्तीच्या ठिकाणी राज्यप्रमुखाने थांबून पुनर्वसन केले पाहिजे. तसे होताना दिसत नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

शहांना दिले प्रत्युत्तर - शरद पवार यांनी लोकांसाठी काय केले, हा विषय बाजूला ठेवू. पण तुमच्यासारखे बरे-वाईट केले म्हणून पवार कधी तुरुंगात गेला नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. महाजनादेश यात्रा समारोपात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी “शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ असा सवाल केला होता. 

साखर कारखानदार गायब... 
ज्यांनी राज्यात साखर कारखानदारी वाढवली, मोठी केली त्यांच्या सोलापुरातील सभेला जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदाराची हजेरी नव्हती. सत्ता नसल्याने अनेकांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजप-सेनेशी जवळीक साधली. मंगळवारी माजी आ. राजन पाटील वगळता कुणीही उपस्थित नव्हता.

कुठं झक मारायची तिथं मारा!

उस्मानाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात पक्षाचे माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील यांच्या पक्षांतरानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा पहिला संवाद मेळावा मंगळवारी झाला. या मेळाव्यातही पवार उद्विग्न झाल्याचे दिसले. पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांची जीभ सटकली आणि “कुठं झक मारायची तिथं मारा’, असे उद्गार त्यांनी काढले. दरम्यान, पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी आपण उद्विग्न नसल्याचे स्पष्ट केले.

मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद : राष्ट्रवादीचा हा गड ढासळल्यानंतर जिल्ह्यात पक्षाचे काय होणार, असे चित्र असताना संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. पवारांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. पुष्पक मंगल कार्यालयात जागा शिल्लक नसल्याने बाहेर थांबून कार्यकर्त्यांनी पवारांचे विचार ऐकले.

पवार म्हणाले 
> इतकी वर्षे तुम्हाला सत्ता दिली. त्या वेळी काही केले नाही, आता कसला विकास करणार आहात? 
> एक नेता मला भेटला. त्याने कारखान्याची चौकशी लावली जात असल्याने भाजपमध्ये जात असल्याचे सांगितले. मी म्हटलो, कुठं झक मारायची तिथं मारा.