आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवार संध्याकाळी मुंबईत आमदारांची बैठक घेणार, काँग्रेसने अजित पवारांनी पाठींबा दिल्याची माहिती नाही  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजित पवारांनी आज भाजपसोबत हातमिळवणी केली

मुंबई- आपला पुतण्या आणि विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी शनिवारी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी 4.30 वाजता आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहात. 
आज(शनिवार) सकाळी भारतीय जनता पक्षाचे(भाजप)नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आपल्या पक्षाला धक्का देत भाजपसोबत हातमिळणी करुन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने 54 जागा जिंकल्या तर अजित पवारांनी बारामतीमधून तब्बल 1.64 लाख मताधिक्याने निवडणूक आले. अद्याप राष्ट्रवादीचे किती आमदार अजित पवारांसोबत भाजपला पाठींबा देणार याची माहीती नाहीये.
"या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी सायंकाळी साडेचार वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. अद्याप काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अजित पवारांसोबत जात असल्याची माहीत नाहीये. शुक्रवारी रात्रीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात व्यस्त होती, यातच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केला की, अजितदादांनी पक्षाच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचा दुरुपयोग केला, त्या आधारे नवीन सरकार स्थापन केले. हे सरकार विधानसभेत फ्लोर टेस्ट पास करणार नाही असा दावा त्यांनी केला. सकाळी राजभवनात गेलेले ते आमदार आता शरद पवारांना भेटले आहेत. पवार, आणि काँग्रेस नेते अहमद पटेल, के सी वेणूपगोपाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 12.30 वाजता संयुक्त निवेदन करतील, असे मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...