आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा उद्यापासून निवडणूक प्रचार दौरा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात धडाडणार तोफ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसाचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे. 
पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यत शरद पवार झंझावाती दौरा करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जारी केली आहे.

राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता, पारोळ्यात संध्याकाळी 5 वाजता, 9 ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी 11.30 वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा येथे सायंकाळी 4 वाजता, 10 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट येथे सकाळी 10.30 वाजता, बुटीबोरी-हिंगणा 3 वाजता, काटोल 5 वाजता इत्यादी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...