आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar, Udhdav Thackeray And Devendra Fadanivs Speeches During Election Rally

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश, राजस्थानसारखा बदलाचा मूड जाणवताेय - शरद पवार; शेतकऱ्याच्या खात्यात १० हजार देऊ, पुन्हा सत्ता आमचीच - उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव  - राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्याची ढाल करून केंद्रीय नेतृत्वाने लाेकसभा निवडणूक जिंकली, देशाचा विषय असल्याने जनतेनेही त्यांना पाठिंबा दिला, परंतु महाराष्ट्रातील विषय वेगळे आहेत. कलम ३७०, सर्जिकल स्टाइक हे गुळगुळीत विषय महाराष्ट्रात या वेळी चालणार नाहीत. शेतकरी आत्महत्या, बेराेजगारी, वाढलेली गुन्हेगारी हे विषय महाराष्ट्राचे असल्याने या वेळी मध्य प्रदेश आणि राजस्थानसारखी बदलाची हवा आणि जनतेचा मूड मला जाणवत असल्याने या निवडणुकीत मी विशेष रस घेऊन काही समीकरण मांडल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगून अपक्षाला पाठिंबा देण्याचा प्रयाेग त्यांनी केला. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रात सरकार असून राजस्थान, मध्य प्रदेशात जनतेने भाजपची राज्य सरकारे उलथून लावली. महाराष्ट्रात शासनाकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे येथेही सत्ताबदल अटळ आहे. महागाई, बेराेजगारी, आत्महत्या, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे या चिंतेच्या बाबी आहेत. विराेधकांना चाैकशा, ईडी, इन्कम टॅक्स, पाेलिस या यंत्रणांचा धाक दाखवून पक्षात सामावून घेतले जात आहेत. जाणारे मजबूर असतीलही, परंत जनतेला हे सर्व दिसत असल्याने या वेळी बदलाची हवा असल्याचे पवार म्हणाले.
 

मी आकडेबाज माणूस नाही
पवार म्हणाले, भाजपचे अनेक लाेक काही दरराेज आकड्यांचा वल्गना करतात. परंतु, मी मात्र काेणताही आकडा सांगणार नाही. आकड्यात खेळणारा वर्ग वेगळा असताे. मी आकडेबाज नाही आणि ज्याेतिषीदेखील नाही, किती जागा येतील हे मी कधीही सांगत नाही. बदल हाेईल हे मात्र अनुभवावरून सांगू शकतो.
 

माझा ७/१२ चेक करून घेताे
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ७/१२ काेरा करू अशी घाेषणा केली. मी दाैऱ्यावर असल्याने याबद्दल जास्त माहीत नाही. परंतु घरी गेलाे मी माझा ७/१२ चेक करून घेताे, कदाचित आताही त्यांचेच सरकार असल्याने शिवसेनेने ७/१२ काेरा केला असेल, असा चिमटा काढत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी ५ वर्षांत शेतकऱ्याचा ७/१२ उतारा काेरा का केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. 


आम्हीच जोरात : शेतकऱ्याच्या खात्यात १० हजार देऊ, पुन्हा सत्ता आमचीच - उद्धव ठाक
रे
प्रतिनिधी | संगमनेर -  शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच करणार नाही, तर त्यांना चिंतामुक्तदेखील करू. पुढील पाच वर्षांत त्यांचा सातबारा कोरा करून दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यात दहा हजार रुपये देऊ. आता राज्यात महायुतीचेच सरकार येणार असून २०० पेक्षा किती जास्त जागा मिळतील एवढाच निकाल बाकी आहे. संगमनेरमध्येदेखील नवल घडेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यात मुंबईत शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर ठाकरे यांची राज्यातील पहिलीच सभा बुधवारी संगमनेरमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्यासाठी झाली.  ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. दोन्ही काँग्रेस थकल्याने ते एकत्र येतील या सुशीलकुमार यांच्या विधानाचा धागा पकडत काँग्रेस-राष्ट्रवादी खाऊन खाऊन थकले असा टोला त्यांनी मारला. बेरोजगारांना काम देऊ म्हणणारे हे सगळेच सत्तेतून बेकार झाल्याने शरद पवारांबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता बेकारी कळली आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असतील तर शरद पवारांना आता विदेशी सोनिया गांधी चालतील का? दोन्ही पक्षांचा नेता कोण असेल हे विरोधकांनी स्पष्ट करावे. राहुल बँकॉकला पोहोचले असल्याने आता थोरातांनीसुद्धा निश्चिंत मनाने घरी जावे, असे ठाकरे म्हणाले.
 

विरोधकांचे बारा वाजवू 
विरोधकांचे पाच-दहा निवडून आले तरी तेदेखील आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? असं हाेणार असेल, तर त्यांना मते कशाला द्यायची, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात १२ विरुद्ध ० असा निकाल लावून िवरोधकांचे बारा वाजवायचे ठरले आहे, असेही ठाकरे  म्हणाले.

निश्चिंत मनाने घरी जा...
ठाकरे म्हणाले, विखे यांच्या भाजप प्रवेशाचा हवाला देत विखेंच्या दोन पिढ्या त्या वेळी आणि आजदेखील आमच्यासोबत असून पिढ्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याला कर्मदरिद्री माणसे कारणीभूत आहेत. धगधगते निखारे आता आमच्याकडे आले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला पोहोचले असल्याने आता थोरातांनीसुद्धा निश्चिंत मनाने घरी जावे.
 

राज्य आमचेच : अपयशाच्या भीतीने राहुल परदेशात
धुळे | काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात जगातील सर्वच आश्वासने दिले आहेत. हा जाहीरनामा  फसवा आहे. मुळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पायपोस एकमेकांत नाही. राष्ट्रवादी पक्ष तर निम्मा संपला आहे. उर्वरित निवडणुकीनंतर संपणार, अशी  टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेर येथील सभेत केली. ते म्हणाले, राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीला विजय मिळणार नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी अपयशाच्या भीतीने महाराष्ट्रात न येता बँकाँकला निघून गेले आहेत. शरद पवार दौरे करत आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग नाही.

बातम्या आणखी आहेत...