आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवार २०२२ मध्ये ‘एनडीए’चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार : संघ प्रचारक  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजप सरकारच्या स्थापनेत शरद पवार यांची मूकसंमती असल्याचा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दिलीप देवधर यांनी शरद पवार २०२२ मध्ये एनडीए त्यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत बक्षीस देईल, असे वक्तव्य केले. तसेच सुप्रिया सुळे लवकरच मोदी मंत्रिमंडळात सामिल होतील, असे भाकितही त्यांनी वर्तवले.
ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सरकार स्थापन केल्याने संघही खुश आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संघाचे पदाधिकारी नाराज आहेत. भाजपत एखादी बाहेरची व्यक्ती आल्यास पक्षाच्या नेत्यांना अडचण भासत असेल. पण संघ परिवार बाहेरच्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. यामुळे संघाचा विस्तार होतो. 



निवडणूक निकालानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यात भाजपविरोधात आक्रमकता दिसून येत नाही. ते चतुर खेळाडू आहेत. ज्याप्रकारे बिहारमध्ये नितीशकुमारांना एनडीएत आणणारे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी केले, त्यांना भाजपकडून राष्ट्रपतिपदाचे बक्षीस मिळाले. त्याच प्रकारे महाराष्ट्रात सत्तास्थापनेत मूकसंमतीचे बक्षीस शरद पवार यांना राष्ट्रपती बनवून भाजप देऊ शकते. शरद पवार यांची मूक संमती असेल तर मग अजित पवार यांना विधीमंडळाच्या नेते पदावरून का काढले? या प्रश्नावर देवधर म्हणाले की, ‘आघाडी धर्माचे पालन करत असल्याचे दाखवावे लागते. साेनिया गांधी इटलीच्या असल्याचे सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. शरद पवार यांचे हे राजकीय चातुर्य आहे.’