kolhapur flood / शरद पवार पूरग्रस्तांसोबत साजरा करणार स्वातंत्र्य दिन, दोन दिवस करणार कोल्हापूर-सांगलीचा दौरा

पूरग्रस्त भागातील लोकांची घेणार भेट, मदकार्याची करणार पाहणी 
 

दिव्य मराठी वेब

Aug 13,2019 11:17:00 AM IST

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 14 आणि 15 ऑगस्टला सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन सुरु असलेले मदतकार्य आणि लोकांची भेट घेणार आहेत. दरम्यान शरद पवार 15 ऑगस्ट रोजी शिरोळ येथे पूरग्रस्तांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत.

कोल्हापूर-सांगलीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महापूरात अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूर जरी ओसरत असला तरी यानंतरच्या संकटांला पूरग्रस्तांना सामोरे जावे लागत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था. दानशून व्यक्तींसह राजकीय पक्ष देखील पुढे सरसावले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या आवाहनानंतर बारामतीकरांनी पूरग्रस्तांनी अर्धा तासात 1 कोटी रुपये गोळा केले होते. शरद पवार 14 आणि 15 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात तेथील लोकांची भेट घेणार आहेत. तसेच तेथे सुरु असलेल्या मदत कार्याची ते पाहणी करतील. तसेच शिरोळ येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत.


X
COMMENT