आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी कार्यालयात जाणार नाही, विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न - शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. यासह ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


दरम्यान, ईडीकडून शरद पवारांना हजर होण्याबाबत कोणताही नोटीस मिळालेली नसताना पवार ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. यामुळे जेव्हा चौकशीसाठी बोलावू तेव्हाच या असा संदेश ईडीकडून मिळण्याची शक्यता आहे. 

शांतता राखण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन :
मी शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात गर्दी करू नये. शांतता राखावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी आपल्या ट्विटद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...