आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या, शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने निश्चित असा कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. 
पवार यांनी आपल्या पत्रासोबत दुष्काळाचा सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. यापूर्वीच्या दुष्काळापेक्षा या वेळची स्थिती गंभीर असून दुष्काळाचा कालावधीही मोठा असल्याचे नमूद करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना अमलात आणण्याची मागणी पवार यांनी आपल्या पत्रात केली आहे. 


पवार म्हणतात, पीक परिस्थिती (पैसे वारी) गाव वार वस्तुस्थितीचे अहवाल विचारात घेतले जात होते. आता तालुक्यातील पावसाची सरासरी विचारात घेतल्याने जेथे दुष्काळ आहे, तेथे जाहीर झालेला नाही, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करावा. पाण्याचे टँकर सुरू करण्यास विलंब टाळण्यासाठी प्रांताधिकारी यांना मंजुरीचे अधिकार द्यावेत. उचल पाणी योजनांना दोन महिन्यातून एकदा सरकारने वीज बिल भरून दुष्काळी भागात महिन्यातून किमान एकदा पाणी उपलब्ध करून द्यावे. पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत द्यावी. तसेच फळबागा जगवण्यासाठी टँकरसाठी हेक्टरी ५ हजार द्यावेत. जनावरांची कत्तल होऊ नये व दुग्ध व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून चारा छावण्या सुरू कराव्यात. स्थलांतर होत असल्याने निवासी शाळा सुरू कराव्यात. 

बातम्या आणखी आहेत...