political / शरद पवारांची पहिली निवडणूक, बारामतीतूनच होता काँग्रेसींचा विरोध

बारामती पंचायत समितीच्या कार्यालयात १९६७ च्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मतमोजणी सुरू असताना पवारांचे निवडणूक प्रतिनिधी मुरलीधर तावरे आणि शिवाजीराव भोसले. मतमोजणीचे निरीक्षण करताना स्वत: उमेदवार शरद पवार. बारामती पंचायत समितीच्या कार्यालयात १९६७ च्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मतमोजणी सुरू असताना पवारांचे निवडणूक प्रतिनिधी मुरलीधर तावरे आणि शिवाजीराव भोसले. मतमोजणीचे निरीक्षण करताना स्वत: उमेदवार शरद पवार.

फ्लॅशबॅक उमेदवारी न देण्याची केली होती शिफारस, प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे पवारांना तिकीट

Sep 14,2019 08:54:00 AM IST

नाशिक : सन १९६७ ची विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार होती. युवक काँग्रेसचे २६ वर्षीय अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी 'बारामतीतून संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढशील का?' असं विचारलं. मात्र बारामतीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन 'शरद पवार' या नावाला आक्षेप घेत कडाडून विरोधही केला. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी या नावाच्या शिफारस प्रस्तावाला बारामती तालुका काँग्रेसने १ विरुद्ध ११ असा निकाल कळवला. जिल्हा काँग्रेसनेही तो तसाच प्रदेश काँग्रेसकडे पाठवला.


तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी प्रदेशच्या संसदीय मंडळापुढे उमेदवारांची नावे आणि स्थानिक संघटनांचे ठराव चर्चेला आले. पुणे जिल्हा काँग्रेसने बारामती तालुका काँग्रेसकडून आलेला ठराव पुढे करून 'शरद नवखा आहे, त्याच्या उमेदवारीला सर्वांचा विरोध आहे. त्याचा निवडणुकीत निभाव लागणार नाही' अशी भूमिका मांडून पुण्याच्या मालतीबाई शिरोळे यांच्या उमेदवारीची मागणी केली. मात्र, प्रदेशाध्यक्ष पाटील व मुख्यमंत्री चव्हाण यांनी पवारांच्या नावाचा आग्रह कायम ठेवला. विरोधातील एकाला चव्हाणांनी विचारले, २७०पैकी किती जागी काँग्रेस विजयी होईल? नेता उद्गारला, १९० ते २००. चव्हाणांनी प्रतिप्रश्न केला, 'म्हणजे, ८० उमेदवार पराभूत होतील तर?' नेता म्हणाला, शक्य आहे. त्याचा आधार घेऊन यशवंतराव म्हणाले, 'ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या.' अशा प्रकारे शरद पवारांना त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली. पण स्थानिक विरोध कायम राहिला.


यानंतर उत्साह दुणावलेल्या शरद पवार यांनी बारामती गाठून प्रचारास सुरुवात केली आणि तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन शरद पवारांच्या पवारासाठी एकजूट केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बाजूने तालुक्यातील सर्व युवावर्ग आला. एका बाजूला विरोधात गेलेले बुजुर्ग आणि दुसरीकडे नवीन नावासोबत एकत्र झालेली युवा पिढी. युवा पीढीने त्या वर्षी बारामतीतून या नवख्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दुप्पट मताधिक्याने विजयी केले. याच बारामतीने पुढे राज्याला सर्वात तरुण मुख्यमंत्री दिला.
(संदर्भ : लोक माझे सांगाती)

X
बारामती पंचायत समितीच्या कार्यालयात १९६७ च्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मतमोजणी सुरू असताना पवारांचे निवडणूक प्रतिनिधी मुरलीधर तावरे आणि शिवाजीराव भोसले. मतमोजणीचे निरीक्षण करताना स्वत: उमेदवार शरद पवार.बारामती पंचायत समितीच्या कार्यालयात १९६७ च्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मतमोजणी सुरू असताना पवारांचे निवडणूक प्रतिनिधी मुरलीधर तावरे आणि शिवाजीराव भोसले. मतमोजणीचे निरीक्षण करताना स्वत: उमेदवार शरद पवार.