शरद पवार करणार / शरद पवार करणार ‘पुणे एकेकाळी’चे प्रकाशन:शंभर वर्षांपूर्वीच्या पुण्याचे दर्शन घडवणार

प्रतिनिधी

Nov 07,2018 09:13:00 AM IST

पुणे - शंभर वर्षांपूर्वीचे पुणे कसे होते, जुन्या वास्तू कशा होत्या, त्यांची वैशिष्ट्ये काय होती...या प्रश्नांच्या उत्तरांसह पुण्यातील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तूंचे दर्शन घडवणारे वैशिष्ट्यपूर्ण कॉफीटेबल बुक पुण्याचा इतिहास मुखोद्गत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकाशित करणार आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता बालशिक्षण मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने निवेदक सुधीर गाडगीळ, शरद पवार यांच्यासह ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर संवाद साधणार आहेत. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.


‘पेपरलिफ’चे जतन भाटवडेकर यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी ‘स्मरणरम्य पुणे’ या विषयावरील दिनदर्शिकाही प्रकाशित केली जाणार आहे. ‘पुणे एकेकाळी’ हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत एकाच वेळी प्रकाशित होणार आहे. त्याचे लेखन मंदार लवाटे यांनी केले आहे, असे भाटवडेकर म्हणाले.

X
COMMENT