आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar's 'VVYIP' Quota Seats At The Oath taking Ceremony Of The Modi ; The Disclosure Of The Rashtrapati Bhavan

माेदींच्या शपथग्रहण समारंभात शरद पवारांना ‘व्हीव्हीआयपी’ काेट्यातून दिली हाेती जागा ; राष्ट्रपती भवनचा खुलासा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या गत ३० मे राेजी झालेल्या शपथग्रहण समारंभात बसण्यासाठी याेग्य ते स्थान व मान न मिळाल्याने राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाले हाेते. पाचव्या रांगेत बसायला जागा मिळाल्यामुळे ते समारंभास गेले नव्हते. या प्रकाराची चर्चा झाल्यानंतर राष्ट्रपती भवनकडून याबाबत बुधवारी टि‌्वट करून खुलासा करण्यात आला. त्यात शरद पवारांना या कार्यक्रमात बहुतांश ज्येष्ठ पाहुण्यांसाठीच्या व्हीव्हीआयपी विभागातून निमंत्रण देण्यात आले हाेते, असे म्हटले आहे. 


याबाबत राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांचे माध्यम सचिव अशाेक मलिक टि‌्वट करून ही माहिती दिली. पवारांसाठी व्हीव्हीआयपी ब्लाॅकमधील पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था केली गेली हाेती व ‘व्ही’ सेक्शनमधून त्यांना आमंत्रण दिले हाेते. मात्र, त्यांच्या कार्यालयातील कुणी तरी ‘व्ही’ला (व्हीव्हीआयपींसाठी) राेमन अंकातील ‘पाच’ समजून घेतले असावे किंवा त्याबाबत त्याने गैरसमज करून घेतला असावा. यामागे पवारांचा अपमान करण्याचा काेणताही हेतू नव्हता, असे मलिक यांनी त्यांच्या टि‌्वटमध्ये म्हटले आहे.