आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पौर्णिमेला रात्री खीर खाण्याचे काय आहे महत्त्व, या विधीनुसार करा व्रत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्विन मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला महालक्ष्मीचे व्रत केले जाते. यावेळी हे व्रत 23 ऑक्टोबर, मंगळवारी आहे. धर्म शास्त्रानुसार, जो मनुष्य शरद पौर्णिमेला संपूर्ण श्रद्धेने आणि विधीनुसार महालक्ष्मी व्रत करतो, त्याला दीर्घायुष्य आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.


या विधीनुसार करावे पौर्णिमा व्रत 
- शरद पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर कुलदेवतेचे पूजन करावे. स्वतःला विधिव्रत पूजा करणे शक्य नसल्यास एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी.
- मध्यरात्री गायीच्या दुधाची खीर तयार करून देवाला नैवेद्य दाखवावा. खिरीचे भांडे रात्री आकाशाखाली चंद्र प्रकाशात ठेवावे.
- यामध्ये चंद्र किरणांच्या माध्यमातून अमृत पडते, अशी मान्यता आहे. पूर्ण चंद्र मध्यकाशात स्थित झाल्यानंतर पूजन करावे.
- या दिवशी काशाच्या भांड्यात तूप भरून सोन्यासहित ब्राह्मणाला दान दिल्यास मनुष्य ओजस्वी होतो. असे धर्म शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे.


यामुळे शरद पौर्णिमेला दुधाच्या खरीचे आहे महत्त्व... 
- शरद पौर्णिमेच्या रात्री खीर खाण्याची प्रथा आहे. शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या संपूर्ण कलांनी प्रकाशमय झालेला असतो. या रात्री चंद्रातून निघालेली किरणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर राहतात.
- धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. याच कारणामुळे शरद पौर्णिमेला लोक घराच्या छतावर खीर ठेवतात ज्यामुळे चंद्राचे किरण त्या खिरेच्या संपर्कात येतात आणि त्यानंतर खीर सेवन केली जाते.
- शरद पौर्णिमेच्या रात्रीचा वैज्ञानिक दृष्टीकोन पाहिल्यास हा काळ ऋतू परिवर्तनाच्या सुरुवातीचा असतो. या दिवसानंतर शीत (हिवाळा) ऋतुचे आगमन होते. शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण करून खीर खाणे हे या गोष्टीचे प्रतिक आहे की, शीत ऋतूमध्ये गरम पदार्थांचे सेवन करावे कारण यामुळे आपल्याला जीवनदायिनी उर्जा प्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...