आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्‍ताधारी व हितसंबंधी घटकांकडून बहुजनांत फूट पाडण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सत्ताधारी व हितसंबंधी घटक मराठा आंदोलन बदनाम करून मराठा समाज व इतर बहुजन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मराठा आरक्षणासाठी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनामुळे सर्वसामान्य आणि बहुजनांच्या ज्या सदिच्छा व पाठिंबा प्राप्त झाला त्याला धक्का बसेल असे कृत्य करू नका, असे आवाहनही त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.

 

वाळूजच्या हिंसाचाराची दखल घेत उद्योगाला आंदोलनाची झळ बसणार नाही याची दक्षता घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

वैधानिक बाबींसाठी वेळ देणे आवश्यक
आंदोलन सुरू करताना कोठे थांबवावे याचा विचार आवश्यक असतो. हा विचार केल्याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन करताना पवार म्हणाले, देशाला मागण्या कळल्या आहेत. मात्र त्या पूर्ण होण्यासाठी वैधानिक बाबींची पूर्तता होण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ देणे आवश्यक असून आंदोलकांनी आता शांततेला प्राधान्य द्यावे.

 

बातम्या आणखी आहेत...