आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिस्टोफर क्लेरे
न्यूयॉर्क - एकविसाव्या शतकातील सर्वात श्रीमंत आणि लाेकप्रिय ठरलेल्या टेनिसस्टार, रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापाेवाने आपल्या तमाम चाहत्यांना धक्का बसणारा निर्णय घेतला. तिने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून बुधवारी निवृत्ती जाहीर केली. रशियाची ही ३२ वर्षीय टेनिसपटू मागील काही वर्षांपासून गंभीर दुखापतीमुळे त्रस्त हाेती. त्यामुळेच तिला अनेक माेठ्या स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करता आली नाही. रशियाच्या शारापाेवाने २००४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी विम्बल्डनमध्ये नंबर वन सेरेनाला पराभूत केले हाेते. ती सलग ११ वर्षे सर्वाधिक कमाई करणारी जगातील पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे.
कारकीर्द
> ५ ग्रँडस्लॅम : ऑस्ट्रेलियन ओपन (२००८), फ्रेंच ओपन (२०१२,१४), विम्बल्डन (२००४), अमेरिकन ओपन (२००६).
> ३६ टूर सिंगल्स टायटल जिंकले.
> लंडन ऑलिम्पिक- २०१२ मध्ये राैप्य.
> ऑगस्ट २००५ मध्ये नंबर-१, २१ व्या आठवडे अव्वलस्थानी.
वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांसाेबत फ्लाेरिडात
वयाच्या सहाव्या वर्षी शारापाेवाने टेनिसच्या काेर्टवर पाऊल ठेवले. मार्टिना नवरातिलोवाने तिच्यातील टेनिसची गुणवत्ता पारखली. त्यानंतर तिला टेनिसचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी अमेरिकेत घेऊन जाण्याचा सल्ला शारापाेवाच्या वडिलांना दिला. त्यामुळे वडिल युरी यांनी तात्काळ रशियातून फ्लाेरिडा गाठले. शारापाेवाने वयाच्या १४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसच्या करिअरला सुरुवात केली हाेती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.