Home | Sports | Other Sports | Shardul Vihan becomes the youngest medalist

शार्दूल विहान ठरला सर्वात युवा पदकविजेता; पुरुष कबड्डी संघ पराभूत, महिला फायनलमध्ये

वृत्तसंस्था | Update - Aug 24, 2018, 06:24 AM IST

प्रतिभावंत १५ वर्षीय नेमबाज विहान शार्दूलने अव्वल कामगिरी करताना १८ व्या एशियन गेम्समध्ये विक्रमाला गवसणी घातली.

 • Shardul Vihan becomes the youngest medalist

  जकार्ता- प्रतिभावंत १५ वर्षीय नेमबाज विहान शार्दूलने अव्वल कामगिरी करताना १८ व्या एशियन गेम्समध्ये विक्रमाला गवसणी घातली. त्याने गुरुवारी पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात राैप्यपदक पटकावले. यासह त्याने नेमबाजीमधील भारतीय संघाचे वर्चस्व अबाधित ठेवले. त्याने संघाचे नेमबाजीमधील चाैथे राैप्यपदक निश्चित केले. तसेच नंबर वन टेनिसस्टार अंकिता रैनाने महिला एकेरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.


  दुसरीकडे सात वेळच्या चॅम्पियन भारतीय कबड्डी संघाला उपांत्य फेरीतील सामन्यात अनपेक्षितपणे लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताच्या पुरुष संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघाला २८ वर्षांनंतर प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्यांदा भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. भारताने चाैथ्या दिवशी एकूण तीन पदकांची कमाई केली. यात एका राैप्यसह दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. यासह भारताच्या नावे अाता एकूण १८ पदके झाली. यामध्ये प्रत्येकी चार सुवर्ण अाणि राैप्यपदकांचा समावेश अाहे.


  दाेन वेळच्या भारतीय महिला कबड्डी संघाने अापला तिसऱ्या किताबाचा दावा मजबूत करताना फायनलमध्ये धडक मारली. या संघाने अंतिम चारच्या सामन्यात चीन-तैपईचा पराभव केला. अाज किताबासाठी संघ मैदानावर उतरेल.


  एका गुणाने किताब हुकला
  भारताच्या १५ वर्षीय विहान शार्दूलचे डबल ट्रॅप प्रकारात अवघ्या एका गुणाच्या पिछाडीने सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. त्याने फायनलमध्ये ७३ गुण संपादन केले. यासह ताे राैप्यपदकाचा मानकरी ठरला. या गटात काेरियाच्या हाइनवू शिनने किताब पटकावला. त्याने ७४ गुणांची कमाई करताना साेनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. तसेच कतारच्या हमाद अलीने कांस्यपदक अापल्या नावे केले. त्याने ५३ गुण संपादन केले. भारताच्या विहानने पात्रता फेरीमध्ये सर्वाधिक १४१ गुण मिळवून अव्वल स्थान गाठले. मात्र, त्याचा फायनलमध्येही अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न काहीसा अपुरा ठरला.


  अंकिता रैनाला कांस्यपदक
  भारताच्या अव्वल प्रतिभावंत टेनिसस्टार अंकिता रैनाने गुरुवारी एशियन गेम्समध्ये कांस्यपदक पटकावले. तिने महिला एकेरीमध्ये हे यश संपादन केले. तिच्या करिअरमधील हे पहिले पदक ठरले. तिला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यातून ती या गटात कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिला चीनच्या झांगने पराभूत केले. चीनच्या खेळाडूने ६-४, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने फायनलमधील प्रवेश निश्चित केला.पराभवामुळे अंकिताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यातील तिचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला.

  कबड्डी : महिला किताबाच्या हॅट््ट्रिकपासून एका पावलावर
  दाेन वेळच्या अाशियाई चॅम्पियन महिला संघाने गुरुवारी विजयी माेहीम अबाधित ठेवताना १८ व्या एशियन गेम्सच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह भारतीय महिला संघ अाता किताबाच्या हॅट््ट्रिकपासून अवघ्या एका पावलावर अाहे. भारताच्या महिलांनी उपांत्य सामन्यात चीन-तैपईच्या संघाला पराभूत केले. जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारतीय महिलांनी २७-१४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह महिलांना सलग तिसऱ्यांदा फायनलमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. यापूर्वी भारतीय महिला संघाने सलग २०१० अाणि २०१४ च्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. अाता तिसऱ्यांदा याच किताबाचा बहुमान पटकावण्याची भारतीय महिलांना संधी अाहे. यासाठी भारतीय संघ सज्ज झाला अाहे. भारतीय महिलांचा किताबासाठीचा फायनल मुकाबला अाज शुक्रवारी इराण टीमशी हाेईल.


  अाता सलग दुसऱ्या वर्षी भारतीय महिला अाणि इराणचा संघ फायनलमध्ये समाेरासमाेर येत अाहे. गत २०१४ च्या स्पर्धेत या दाेन्ही संघांमध्ये फायनल रंगली हाेती. यामध्ये भारतीय संघ वरचढ ठरला. त्यामुळे अाताही कितबावरचे अाणि इराणविरुद्धचे वर्चस्व अबाधित ठेवण्याचा भारतीय महिलांचा मानस अाहे. यासाठी टीम सज्ज झाली अाहे.

  बॅडमिंटन : सायना, सिंधूची सलामी; अश्विनी दुहेरीत विजयी
  माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह तिसऱ्या मानांकित पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीमध्ये विजयी सलामी दिली. यासह त्यांनी प्री-क्वार्टर फायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत अश्विनी पाेनप्पाने अापली सहकारी एन सिक्की रेड्डीसाेबत विजयाची नाेंद केली. त्यांनी पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या वाई-यियुंगवर मात केली. त्यांनी ३२ मिनिटांत २१-१६, २१-१५ ने विजय मिळवला.


  सिंधूची शर्थीची झुंज : भारताच्या सिंधूने एकेरीतील अापल्या माेहिमेला सुरुवात करण्यासाठी शर्थीची झुंज दिली. तिने सलामीच्या सामन्यात व्हिएतनामच्या त्रांग थी वूला पराभूत केले. तिने ५८ मिनिटांत २१-१०, १२-२१, २३-२१ ने सामना जिंकला.


  सायना २६ मिनिटांत विजयी : माजी नंबर वन अाणि राष्ट्रकुलची चॅम्पियन सायना नेहवालने अवघ्या २६ मिनिटांत सलामीचा सामना जिंकला. तिने इराणच्या साेरायावर मात केली. तिने २१-७, २१-९ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली.


  बाॅक्सिंग : विकास, शिव थापा, साेनिया अाजपासून रिंगमध्ये; पदकाचे दावेदार
  गतवेळच्या कांस्यपदक विजेत्या बाॅक्सर विकास कृष्णनसह अाॅलिम्पियन शिव थापा, साेनिया अाता अाज शुक्रवारपासून रिंगमध्ये उतरतील. यांच्याकडून भारतीय संघाचा पदकाचा दावा मजबूत अाहे. विकास हा पुरुषांच्या ७५ किलाे वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. त्याने २०१० मधील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले हाेते. शिव थापा हा ५६ किलाे वजन गटात पदकाचा प्रबळ दावेदार अाहे. तसेच मनाेजकुमार हा ६९ किलाे वजन गटात अापले काैशल्य पणास लावेल. महिलांच्या ५७ किलाे वजन गटात भारताच्या साेनिया लाठरवर सर्वांची नजर असेल.

  टेनिस : बाेपन्ना-दिविजला ‘सुवर्ण’संधी; पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये दाखल
  भारताचा अनुभवी टेनिसस्टार राेहन बाेपन्नाला अाता १८ व्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची संधी अाहे. त्याने अापला सहकारी दिविज शरणसाेबत गुरुवारी पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. यासह या जाेडीने भारतीय संघाचे दुहेरीतील पदक निश्चित केले. बाेपन्ना अाणि दिविजने दुहेरीच्या उपांत्य सामन्यात जपानच्या काइताे-शिमाबुकराेवर मात केली. त्यांनी १ तास १२ मिनिटांच्या रंगतदार लढतीत ४-६, ६-३, १०-८ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह त्यांनी फायनल गाठली. अाता विजयाची हीच लय कायम ठेवल्यास भारताच्या या जाेडीला किताबाचा बहुमान अापल्या नावे करता येईल. त्यांनी पहिल्या सेटवरील अपयशातून सावरताना उपांत्य सामना जिंकला. त्यांनी दुसऱ्या अाणि तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारून जपानच्या जाेडीला बाहेरचा रस्ता दाखवला.

  बाेपन्नाला दुहेरी मुकुटाची संधी
  भारताच्या राेहन बाेपन्नाला यंदाच्या स्पर्धेत किताबाचा दुहेरी मुकुट पटकावण्याची संधी अाहे. त्याने यासाठी पुरुष दुहेरीची फायनल गाठली. त्यापाठाेपाठ ताे अाता एकेरीतील अंकितासाेबत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला अाहे.


  तिरंदाजी : अतानू दास अंतिम अाठमध्ये; दीपिकाची निराशा
  भारताच्या युवा तिरंदाज अतानू दासने पुरुषांच्या रिकर्व्हच्या वैयक्तिक गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे माजी नंबर वन दीपिका कुमारीला महिलांच्या गटात पराभवाचा सामना करावा लागला तसेच विश्वास कुमारनेही निराशा केली. यामुळे अंतिम अाठमध्ये प्रवेश करणारा अतानु हा भारताचा एकमेव तिरंदाज अाहे. जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या अतानुने प्री-क्वार्टर फायनलमध्ये कजाखला पराभूत केले. त्याने सामना जिंकला. अाता त्याच्यासमाेर अंतिम अाठमध्ये इंडाेनेशियाच्या रियाऊ इगा अगाथाचे अाव्हान असेल. तसेच कझाकिस्तानच्या इल्फात अब्दुलिनने अंतिम १६ मध्ये भारताच्या विश्वासवर ७-१ ने मात केली.

Trending