Home | Business | Share Market | share-market

शेअर बाजारात अत्यल्प तेजी

team divya marathi | Update - May 24, 2011, 04:27 PM IST

शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रामध्ये आज तेजी होती. सेन्सेक्स 18.64 अंकांच्या तेजीने 18,011 अंकांवर बंद झाला. तर निफटी 8 अंकाच्या तेजीसह 5,394 अंकांवर बंद झाला.

  • share-market

    शेअर बाजारात अत्यल्प तेजी

    शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रामध्ये आज तेजी होती. सेन्सेक्स 18.64 अंकांच्या तेजीने 18,011 अंकांवर बंद झाला. तर निफटी 8 अंकाच्या तेजीसह 5,394 अंकांवर बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 54 अंकांच्या तेजीने उघडला. ही तेजी दुपारच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेरच्या सत्रात काही प्रमाणात घसरण झाली. निफटीमध्येही सकाळच्या सत्रात तेजी होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये उलाढाल कमी होती. तर पीएसयु, रिएलिटी, मेटल आणि एफ एमसीजी क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. आतरराष्ट्रीय बाजारांमध्येही आज उत्साह जाणवला नाही. अमेरिकेतील शेअर बाजारात काल घसरण झाली होती. आशियातील बाजार स्थिर होते. तर युरोपातील बाजारांमध्येही अशीच स्थिती होती.

Trending