Home | Business | Share Market | share market, business

गुंतवणूक : शेअर की म्युच्युअल फंड?

agency | Update - May 31, 2011, 11:35 AM IST

गुंतवणूकदारांना नेहमी प्रश्न पडतो की, सरळ शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडामध्ये? अशा गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकत्र करून ती शेअर्समध्ये किंवा बाँड्समध्ये गुंतवावयाची यासाठी शेअर मार्केटचे पूर्ण ज्ञान असलेल्या अधिकार्‍यांकडून त्याबाबत निर्णय घ्यावयाचा.

 • share market, business

  गुंतवणूक : शेअर की म्युच्युअल फंड?
  -गोपाळ गलगली
  गुंतवणूकदारांना नेहमी प्रश्न पडतो की, सरळ शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडामध्ये? अशा गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकत्र करून ती शेअर्समध्ये किंवा बाँड्समध्ये गुंतवावयाची यासाठी शेअर मार्केटचे पूर्ण ज्ञान असलेल्या अधिकार्‍यांकडून त्याबाबत निर्णय घ्यावयाचा. म्युच्युअल फंड चालवण्यासाठी येणारा खर्च, नोकरदारांचा पगार, भत्ता, जाहिरातीवरील खर्च, ऑफिसचे भाडे, कॉम्प्युटरचा आणि फोनचा खर्च झालेल्या फायद्यातून वजा करून तो सभासदांना वाटावयाचा अशी म्युच्युअल फंडाची व्यवस्था असते. केलेल्या गुंतवणुकीची दररोजच्या भावाप्रमाणे किंमत करून, एकूण किमतीला भागून आलेली एका युनिटची किंमत NAV (net asset value) म्हणून दररोज जाहीर करावयाची अशी पद्धत असते. या दररोज जाहीर केलेल्या AV च्या किमतीप्रमाणे युनिट्सची खरेदी-विक्री करण्यात येते. काहींच्या बाबतीत खरेदी करताना खरेदी भार (Entry load) जादा द्यावा लागतो. काही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीच्या काळाचेदेखील बंधन असते. शिवाय कमीत कमी गुंतवणुकीचेही बंधन असते. फंड्स दोन प्रकारचे असू शकतात. Open ended म्हणजे काळाचे बंधन नसलेले आणि Close ended म्हणजे अमुक काळानंतर बंद होणारे.

  शेअर मार्केट

  याउलट शेअर मार्केटमध्ये कोणालाही कोणताही शेअर उपलब्ध किमतीमध्ये घेता येतो. अगदी एक शेअरदेखील घेता किंवा विकता येतो. ही खरेदी-विक्री सिबीकडे नोंदविलेल्या ब्रोकरमार्फत करावी लागते. त्यासाठी त्याला काही प्रमाणात ब्रोकरेज द्यावे लागते. याशिवाय खरेदी-विक्री करावयाचे शेअर्स डिमॅट करून घ्यावे लागतात. एका शेअर्सचा एका दिवशी अनेकदा व्यवहार करता येतो.झालेला फायदा-तोटा पूर्णपणे गुंतवणूकदाराला मिळतो. खरेदी-विक्रीचा निर्णय हा स्वत: गुंतवणूकदाराचा असतो. त्यामुळे होणार्‍या परिणामाबद्दल गुंतवणूकदाराला माहिती असते. शेअर्समधील गुंतवणूक ही फायदेशीर पण जास्त जोखमीची ठरते. गुंतवणूकदारांनी याचा मध्य गाठावा.

Trending