आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्समध्ये 427 अंकांनी कोसळला तर निफ्टी 11,814 अंकांवर पोहोचली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपताच शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 426.48 अंकांनी कोसळून 39,481.58 वर आला. तर निफ्टीत देखील 133.25 अंकांची घसरण होऊन 11,813.50 अंकांवर पोहोजली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 39,441.39 आणि निफ्टीने 11,798.65 च्या खालील स्तरवर पोहोचला. याअगोदर भाषण सुरु असताना बाजारात चढ-उतर होत होते. 


अर्थसंकल्पय सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स 124.35 अंकांनी वाढून 40 हजारांच्या पार पोहोचला होता. व्यवसायात दरम्यान, तो 40,032.41 च्या उच्चस्तरावर गेला. तर निफ्टीमध्येही 35 अंकांनी वाढ झाली होती. निफ्टी व्यवसायादरम्यान 11,981.75 च्या उच्च स्तरावर पोहोचली होती. 

 

येस बँकेचे शेअर 5% पडले
व्यवहारादरम्यान सेन्सेक्सचे 30 पैकी 25 आणि निफ्टीचे 50 पैकी 42 शेअर नुकसानीत राहीले. सेन्सेक्समध्ये येस बँकेचे शेअर 5.14% पडले. याशिवाय ओएनजीसी, टीसीएस, एनटीपीसी आणि वेदांता लिमिटेडच्या शेअर्समध्ये 3% पर्यंत घसरण झाली. इंडसइंड बँकेचे शेअर सर्वाधिक 1.45% पर्यंत वाढले. तर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय आणि कोटक बँकेचे शेअर 1% वाढले. 

 

परदेशी गुंतवणुकदारांनी 29 कोटींची इक्विटी विकली

गुरुवारपर्यंतच्या माहितीनुसार, परदेशी गुंतवणुकदारांनी 28.95 कोटी रुपयांची इक्विटी विकली तर देशातील गुंतवणुकदारांनी 58.59 कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. तर शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 16 पैशांनी कमी होऊन 68.66 रूपये झाली. 

 

बातम्या आणखी आहेत...