Home | Business | Share Market | share-prediction-by-experts

फायदेशीर ठरतील असे पाच शेअर

बिझनेस ब्यूरो | Update - May 20, 2011, 11:21 AM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करताना आमच्या तज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

 • share-prediction-by-experts

  शेअर बाजारात गुंतवणूक करताना आमच्या तज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात. खालील पाच शेअर तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात.

  वेलस्पर्न कॉर्प
  खरेदी - १७५ टार्गेट - २४०
  या कंपनीचे ऑर्डर बूक एकदम मजबूत आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीला काही मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे कंपनीची स्थिती आणखी मजबूत होईल. कंपनीच्या शेअरची खरेदी तुम्हाला पुढे फायदा मिळवून देऊ शकते.

  आयडीएफसी
  खरेदी - १२५ टार्गेट - १६०
  पायाभूत सुविधांचे क्षेत्र पुढील काळात विशेष महत्त्वाचे राहणार आहे. त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा आयडीएफसीला मिळेल. या कंपनीच्या शेअरचे भाव पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

  सुझलॉन एनर्जी
  खरेदी - ५० टार्गेट - ७२
  प्रत्येक तिमाहीत या कंपनीचा फायदा वाढतच जातोय. गेल्या वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत या कंपनीने मोठा फायदा कमावला होता. त्यामुळे शेअरच्या किंमतीत वाढ होणार हे नक्की आहे.

  स्टेट बॅंक ऑफ इंडिया
  खरेदी -२२००, टार्गेट - ३२००
  मोठ्या काळासाठी या बॅंकेच्या शेअरची खरेदी ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

  रिलायन्स कॅपिटल
  खरेदी - ५००, टार्गेट - ७५०
  सेबीचे नवे प्रमुख आल्यामुळे म्युच्यूअल फंडांच्या क्षेत्रात पुढील काळात अनेक बदल होणे अपेक्षित आहे. याचा थेट फायदा रिलायन्स कॅपिटलला पोहोचण्याची शक्यता आहे.

  स्रोत - राजीव अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, वेल इंडिया
  (सूचना - वर देण्यात आलेला सल्ला तज्ज्ञांचा वैयक्तिक असून, तो तत्कालिन परिस्थितीवर आधारित आहे. परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो.)

Trending