आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : साेमवारी सेन्सेक्स नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. साेमवारच्या व्यवहार सत्रात सेन्सेक्सने विक्रमी पातळीलाही स्पर्श केला. सेन्सेक्स ५२९.८२ अंकांच्या तेजीसह ४०,८८९.२३ वर बंद झाला. दिवसभरातील व्यवसायात सेन्सेक्सने ४०,९३१.७१ चा उच्च स्तर स्पर्श केला. याआधी रिअॅल्टी क्षेत्रास सरकारकडून २५,००० काेटी रुपयांची मदत मिळाल्यानंतर ७ नाेव्हेंबरला सेन्सेक्स ४०,६५३.७४ च्या विक्रमी उच्च स्तरावर बंद झाला हाेता आणि या दिवशी त्याने ४०,६८८.२७ च्या विक्रमी उच्च स्तरही स्पर्श केला. समभाग व्यावसायिकांनुसार, अमेरिका आणि चीन यांच्यात प्राथमिक व्यापार करारावर या महिन्यात स्वाक्षरी हाेण्याच्या आशेमुळे विदेशी बाजारांत तेजीचा कल आहे. यामुळे भारतीय बाजारातही तेजीचे वातावरण राहिले. निफ्टी १६४.६० अंक वधारत १२,०७९.०० वर बंद झाला. निफ्टी सध्या विक्रमी स्तरापासून थाेडा दूर आहे. निफ्टीने या वर्षी ३ जून राेजी १२,१०३.०५ चा सर्वाेच्च स्तर स्थापन केला आणि या दिवशी हा १२,०८८.५५ च्या विक्रमी स्तरावर बंद झाला हाेता.
इन्फ्राटेल, एअरटेल ७.२०% उसळले, टाटा स्टीलमध्ये ५% तेजी: सेन्सेक्सने भारती एअरटेलमध्ये सर्वाधिक ७.२०टक्के उसळी राहिली. टाटा स्टील ४.९९%, इंडसइंड बँक आणि अॅक्सिस बँक तीन टक्क्यांपेक्षा जास्त, वेदांता, एचडीएफसी, मारुती सुझुकी, काेटक महिंद्रा बँक, टाटा माेटर्स, एशियन पेंट्स आणि भारतीय स्टेट बँक दाेन टक्क्यांपेक्षा जास्त उसळले.
दुसरीकडे, पेंट्स आणि भारतीय स्टेट बँक दाेन टक्क्यांपेक्षा जास्त उसळले. दुसरीकडे बीएसई ३० पैकी केवळ दाेन समभागांत घसरण राहिली. ओनएनजीसी २.१७ टक्के आणि येस बँक १.७० टक्के घसरले. दूरसंचार कंपन्यांमध्ये सर्वाधिक बीएसईच्या दूरसंचार क्षेत्रात सर्वाधिक ६.७८% तेजी राहिली. धातू क्षेत्र ३.३४%, रिअॅल्टी क्षेत्र २.०४ आणि बेसिक मटेरियल्स २.०२% उसळले.
दूरसंचार क्षेत्रात सर्वाधिक ६.७८% ची उसळी : बीएसईमध्ये दूरसंचार क्षेत्रात सर्वाधिक ६.७८ टक्के तेजी राहिली. धातू क्षेत्रात ३.३४ टक्के, रियल्टी क्षेत्र २.०४ टक्के आणि बेसिक मटेरियल्स २.०२ टक्के उसळले.मिडकॅप निर्देशांकात १.१७ टक्के आणि स्माॅलकॅपमध्ये ०.८१% तेजी दिसली.
गुंतवणूकदारांनी प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक केल्याने आली तेजी
१ अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार हाेण्याची आशा वाढली आहे. शनिवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सांगितले हाेते की, चीनसाेबत व्यापार करारावरून प्राथमिक सहमती झाली आहे. दाेन्ही देशांमध्ये या वर्षअखेरीस करार पूर्ण हाेण्याची आशा आहे.
२ बाजार तज्ञांनुसार, फ्युचर अँड ऑप्शन(एफअँडओ)च्या गुरुवारी मुदत संपण्याआधी शाॅर्ट कव्हरिंगमुळे तेजी आली आहे. एका अहवालानुसार, यातून हे लक्षात येते की फ्यूचर अँड ऑप्शनमध्ये शाॅर्ट कव्हरिंग हाेत आहे.
३ जागतिक बाजारपेठेत आलेल्या तेजीमुळे साेमवारी भारतीय शेअर बाजारांतही तेजी दिसली. निक्केई ०.७%, ऑस्ट्रेलियाई शेअर बाजार ०.५% तसेच शांघाय ब्लूचिपमध्ये ०.३% ची बळकटी नाेंदली आहे. हेंग सेंगमध्येही १.५% तेजी दिसली. बहुतांश युराेपीय बाजार तेजीसह खुले झाले.
४ गेल्या काही सत्रांत गुंतवणूकदार काही निवडक क्षेत्रांत गुंतवणूक करत हाेते. मात्र, साेमवारी सकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी सर्व क्षेत्रात गुंतवणूक केली. दूरसंचार, धातू, ऑटाे, बँक आणि रिअॅल्टी क्षेत्राच्या समभागांमध्येही माेठे व्यवहार पाहावयास मिळाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.